त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाले आहे. दुष्काळी पट्ट्यातील इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. यामुळे द्राक्षे, डाळिंब यासह कांदा, टोमॅटो अशा भाजीपाला पिकांवर रोग किडींचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभर काही प्रमाणात ढगाळ हवामान होते. रात्री अचानक ढग जमा होण्यास सुरवात झाली. मध्यरात्रीनंतर जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात धांदल उडाली असली तरी पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला.
या पावसामुळे द्राक्षासह भाजीपाला पिकावर कीड - रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. पुणे शहरातील डेक्कन, कोथरूड या भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. भात पट्यातही ढगाळ हवामानामुळे भात उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांतही काही अंशी ढगाळ हवामान होते.
मंगळवारी (ता. २०) दुपारनंतर काही प्रमाणात ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. शिरूर तालुक्यातील बाभूळसर येथील रामचंद्र नागवडे म्हणाले की, माझ्याकडे सहा एकर कांदा आणि दोन ते तीन एकर टोमॅटो आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमच्या भागात ढगाळ हवामान आहे. परिसरात काही ठिकाणी पाऊसही पडला आहे.
- 1 of 347
- ››