agriculture news in marathi, rain gap will be state, Maharashtra | Agrowon

पावसाची उघडीप राहण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पुणे : माॅन्सूनचे मंदावलेले प्रवाह, उत्तरेकडे सरकलेला माॅन्सूनचा आस, यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता. ८) राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर कोकणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : माॅन्सूनचे मंदावलेले प्रवाह, उत्तरेकडे सरकलेला माॅन्सूनचा आस, यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता. ८) राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर कोकणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

उत्तर बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात गुरुवारपर्यंत (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्याच्या प्रभावामुळे आेडिशासह बंगाल, झारखंड, छत्तीसगड व मध्य भारतात पुढील तीन दिवस पाऊस वाढणार आहे. तर मॉन्सूनचे प्रवाह कमकुवत राहणार असल्याने दक्षिण भारत, महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.  

मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (स्राेत - कृषी विभाग) : कोकण : न्याहडी ३३, रामपूर ३०, सावर्डे ४६, कळकवणे ४५, शिरगांव ३७, पाटपन्हाले ३०, अबलोली ३०, कडवी ३५, मुरडव ३०, फणसावणे ३८, अंगवली ४४, देवरुख ३४, अंबोली ३३. मध्य महाराष्ट्र : बाऱ्हे २२, मानखेड २४, सुरगाणा ३०, नाणशी २१, इगतपुरी २६, घोटी २१, पेठ २२, मुठे २७, काले २५, बामणोली २२, महाबळेश्‍वर २८, तापोळा ५८, लामज ६५, आंबा ३१. मराठवाडा : झरी १०, सालगारा १२, मुलाज १०, मोघाळी १५, मातूळ ११, मुगट १२. विदर्भ : माटरगाव १०, दाताळा ११, धरणगाव ११, जांभूळधाबा २०, पिंपळगाव १०, मुंगळा २०, वार्थी १०, सिरोंचा ३२.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...