agriculture news in Marathi, Rain, hailstorm affected rabbi crop, Maharashtra | Agrowon

वादळी पाऊस, गारपिटीचा फळबागा, रब्बीला तडाखा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात शनिवारी दुपारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे, गारा, मेघर्जनेसह आलेल्या पावसाने गहू, कांदा, मका, भाजीपाल्यासह पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, द्राक्ष या फळबागांचे नुकसान झाले आहे. बराच वेळ गारा पडल्याने काही ठिकाणी गारांचा खच पडला होता. मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. विजा पडल्याने जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत.

पुणे ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात शनिवारी दुपारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे, गारा, मेघर्जनेसह आलेल्या पावसाने गहू, कांदा, मका, भाजीपाल्यासह पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, द्राक्ष या फळबागांचे नुकसान झाले आहे. बराच वेळ गारा पडल्याने काही ठिकाणी गारांचा खच पडला होता. मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. विजा पडल्याने जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत.

रविवारी (ता. ८) दुपारनंतर पुणे, सातारा, नगर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात दाट ढग गोळा झाले होते. पुण्यात हलक्या पावसाच्या सरी पडल्या, तर उर्वरित जिल्ह्यातही पावसाला सुरवात झाली होती. दरम्यान, शनिवारी (ता. ७) विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस पडला, तर यवतमाळ, भंडारा जिल्ह्यातही पावसाच्या सरी पडल्या. या पावसामुळे कलिंगड, खरबूज, संत्रा या फळपिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान कायम असून, शनिवारी सायंकाळी वादळी वारे, धुळीचे लोट, गारपीट अन्‌ पाऊस असे चित्र होते. हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांतील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील मोप (ता. सेनगाव) येथे वीज कोसळून शेतकरी ग्यानदेव निवृत्ती बर्वे यांच्या मालकीचा बैल दगावला. केंद्रा बुद्रुक येथे गारांचा पाऊस झाला.

सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांत गारांसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. माण तालुक्यातील काळचौंडीतील अंगणात उभे असलेल्या दोन तरुणांवर वीज कोसळली. त्यात भागवत अनिल सावंत (वय १८) मृत्युमुखी पडले, तर त्यांच्याबरोबर असलेले अमोल आबासो सावंत (वय १९) हे जखमी झाले. नागठाणे, खटाव तालुक्यात विखळे येथे गारांचा पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू, रब्बी ज्वारी, तसेच आंब्याचे नुकसान झाले आहे. मात्र उन्हाळी पिके, उसाला पाऊस लाभदायक आहे. 

पुणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून असलेल्या उकाड्यानंतर दुपारी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, भाजीपाला, पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, चिंच, मका या पिकांचे नुकसान झाले. रविवारी दुपारनंतर विविध भागांत ढगाळ हवामान होते. उकाड्यातही चांगलीच वाढ झाली होती. शहरात हलक्या पावसाने हजेरी लावली.

नगर जिल्ह्यातील पारनेर, अकोले, कर्जत तालुक्‍यात झालेल्या पावसाने कांदा, भाजीपाला, आंबा, कलिंगडे आणि काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. कर्जत तालुक्‍यात जवळपास पंधरा ते वीस मिनिटे गारपीट झाली. गारपिटीमुळे कांदा, भाजीपाला, आंबा, गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील सायखेडा- चांदोरी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने द्राक्षे, कांदा उत्पादकांची तारांबळ उडाली. 

वादळी पावसाचे सावट कायम
राजस्थानपासून आसामपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा, पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे देशभरात पावसाला पोषक हवामान आहे. तर अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरावरून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातही विजा, जोरदार वारे, गारांसह पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोकणासह काही ठिकाणी हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...