मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला

पावसाचा जोर कमी
पावसाचा जोर कमी

औरंगाबाद : मराठवाड्यातील परतीच्या पावसाचा जोर गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र हिंगोली जिल्ह्यातील नादापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, हिंगोली जिल्ह्यांतील कळमनुरी तालुक्‍याचा अपवाद वगळता इतर ठिकाणी हलका ते तुरळकच पाऊस पडला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यात सरासरी १८ मिलिमीटर पाऊस पडला. तर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यात सरासरी १४.७५ मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्‍यात सरासरी २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या नादापूर या एकमेव मंडळात ८० मिलिमीटर पाऊस झाला.

मराठवाड्यातील सोयगाव, पालम, पाथरी, कळमनुरी, किनवट, हिमायतनगर, देगलूर या तालुक्‍यांत अजूनही आजवर अपेक्षित पावसाच्या तुलनेत साठ टक्‍केही पाऊस पडला नाही. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्‍यात अजूनही अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ३९.३० टक्‍केच पाऊस पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com