agriculture news in marathi, rain in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत काही तालुक्‍यांमध्ये तीन ते सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पण त्याची नोंद नाही. अनेक तालुके कोरडेच असल्याची स्थिती आहे.

जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत काही तालुक्‍यांमध्ये तीन ते सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पण त्याची नोंद नाही. अनेक तालुके कोरडेच असल्याची स्थिती आहे.

रविवारी (ता. १६) दुपारी अचानक काळे ढग जमा झाले. दुपारी १.३० ते ५ यादरम्यान अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी १० ते १५ मिनिटे सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी पाच ते सात मिनिटे हलका पाऊस झाला. जळगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, चोपडा, यावल, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, भडगाव व चाळीसगाव या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती मिळाली. काही तालुक्‍यांमध्ये एक-दोन महसूल मंडळात सरी कोसळल्या. तर इतरत्र कोरडेच वातावरण राहीले.

दोन मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस ज्या भागात होते, त्यासंबंधी कोरड्या दिवसाची नोंद प्रशासन करते. यामुळे काही तालुक्‍यांमधील पावसाची माहिती प्रशासनाने नमूद केलेली नाही. पाचोरा, धरणगाव, जळगाव येथे प्रत्येकी चार मिलिमीटर, भुसावळ, पाचोरा, जामनेरात अनुक्रमे चार, तीन, पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चोपडा, यावल येथेही तीन  मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

सध्या ज्वारी, सोयाबीन, कोरडवाहू कापूस, बाजरी, तूर या पिकांना पाण्याची अधिक गरज आहे. मुरमाड, हलक्‍या जमिनीत पिकाची अवस्था बिकट बनत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने केळी लागवड अनेक शेतकऱ्यांनी टाळली आहे. कारण, केळीला पाण्याची अधिक गरज असते. सोमवारी सकाळपासून थंड वारे वाहत होते. मध्येच ऊन - सावल्यांचा खेळ सुरू होता.

धुळे, नंदुरबारही कोरड
धुळे व नंदुरबारातही कोरडेच वातावरण राहिले. फक्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी उडीद मळणीच्या कामांवर परिणाम झाल्याची माहिती मिळाली.

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...