जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
बातम्या
सातारा ः जिल्ह्यातील खटाव, महाबळेश्वर, माण या तालुक्यांत शुक्रवारी (ता. २२) काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. या तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत पावसाने विश्रांती दिली आहे. यामुळे खरीप पेरणीला गती येणार आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांत दमदार पाऊस झाला आहे. या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाच्या पाण्यामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. महाबळेश्वर व माण तालुक्यांतही काही ठिकाणी पाऊस झाला आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण, जावली, वाई, खंडाळा, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुुक्यांत पावसाने उघडीप दिली आहे. शेतजमीन घातवरी येत असल्याने पेरणीची कामे सुरू झाली आहेत. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत ढगाळ वातावरण झाले होते. दुष्काळी तालुक्यात पावसाचा दमदार पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात रखडलेल्या पेरणीस पुन्हा गती येणार आहे.
- 1 of 566
- ››