agriculture news in Marathi, rain in kokan and west maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने  सुरवात झाली अाहे. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. रविवारपर्यंत (ता.२१) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमानात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    

पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने  सुरवात झाली अाहे. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. रविवारपर्यंत (ता.२१) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमानात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    

राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, रात्रीच्या तापमानात चढ-उतार होत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तर महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस पडला असून, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोर अधिक हाेता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती बुधवारी निवळून गेली आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भातही ढगाळ हवामान होते.

 बुधवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.८.(२०.२), नगर - (१७.६), जळगाव ३६.२(१९.४), कोल्हापूर ३२.६(२२.०), महाबळेश्‍वर २७.८(१७.०), मालेगाव ३६.२(२२.२), नाशिक ३३.८(१८.०), सांगली ३१.६(२०.४), सातारा ३३.१(२१.९), सोलापूर ३५.३(२०.६), सांताक्रुझ ३७.२ (२५.६), अलिबाग ३५.६(२५.४), रत्नागिरी ३५.२(२३.४), डहाणू ३७.३ (२४.१), औरंगाबाद ३४.३(१७.६), परभणी ३५.१(१७.५), नांदेड ३६.०(२०.०), अकोला ३६.०(२०.०), अमरावती ३६.२(१९.८), बुलडाणा ३४.३(२०.८), चंद्रपूर ३५.५(२१.८), गोंदिया ३३.४(२०.५), नागपूर ३४.९(१८.२), वर्धा ३४.५(१८.४), यवतमाळ ३५.५(१८.४). 

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) :  रत्नागिरी : अंगवली २९, कोंडगाव १२, देवरूख १२, लांजा १२, भांबेड ४२, पुनास ११, विलवडे ६०.
 सिंधुदुर्ग : मितबांब १५, शिरगाव २६, बापर्डे २०, मालवण ५६, बांदा २०, आजगाव ४०, अंबोली ७६, मौदा २७, वेंगुर्ला ६३, तलेरे ३९, पिंगुळी २१, वैभववाडी ३१, भुईबावडा १९.
 सोलापूर : सोलापूर ५६, अक्कलकोट १८, दुधनी ४४.
 सातारा : हेळवाक १२.
 सांगली : मडग्याळ २०, मुचुंडी १६, पेठ ११, येवळी २२, देशिंग ३०, कवठेमहांकाळ ३०.
 कोल्हापूर : शिराेळ २२, शिरढोण १२, कुकुडवाड १५. भांबवडे १६, सुरूड १०, साळवण १४, करवीर ११, कसबा ११, सिद्धनेर्ली २१, केनवडे १८, कापशी १५, खडकेवाडा ३५, मुरगुड ४३, गडहिंग्लज १८, दौंडगे २६, हलकर्णी ११, नेसरी १८, गारगोटी १४, पिंपळगाव ११, कूर १०, काडगाव ३०, कराडवाडी १२, अाजरा १८, मालिंग्रे ११, उत्तुर २४, हेरे ३९.

मॉन्सून शनिवारपर्यंत देशाचा निरोप घेणार?
नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशातून परतण्यास पोषक स्थिती निर्माण होत असून, शनिवारपर्यंत (ता.२०) माॅन्सून देशाचा निरोप घेईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सून परतल्यानंतर दक्षिण भारतामध्ये ईशान्य मोसमी वारे (ईशान्य माॅन्सून) सक्रिय होईल. अंदमान बेटांच्या परिसरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, मंगळवारपर्यत (ता. २३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...