मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी

मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी
मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी लातूर व उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील ७५ मंडळात मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात अवकाळी पावसाने हजेरी लावली. किरकोळ हलका, मध्यम तर मोजक्‍या ठिकाणी पावसाचा जोर दमदार स्वरूपाचा राहिला. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून दोन गायी दगावल्याची घटना वगळता इतरत्र पडलेला पाउस पेरणी झालेल्या रब्‌बीच्या पिकांना अल्प प्रमाणात का होईना दिलासा देणारा ठरणार आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मंडळात आज दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी लागली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी सात मंडळात सोमवारी (ता.१९) रात्री व मंगळवारी (ता.२०) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात पाउस झाला. सोयगाव तालुक्‍यातील सावलदबारा मंडळात सर्वाधिक ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ फूलंब्री तालुक्‍यातील फूलंब्री मंडळात १२ मिलिमीटर, आळंद २० मिलिमीटर, वडोदबाजार ७ मिलिमीटर, पिरबावडा ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोयगाव तालुक्‍यातीलच सोयगाव मंडळात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पैठण तालुक्‍यातील आडूळ मंडळात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चापानेर, नागापूर, विहामांडवा, पिशोर, वासडी, पांढरी पिंपळगाव आदी परिसरातही पाउस झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण, बेंबाळी, पाडोळी, जगाजी, केशेगाव, तुळजापूर, सावरगाव, जळकोट, नळदूर्ग, मंगरूळ, सालगरा, इटकळ, नारंगवाडी, डाळिंब, लोहारा, माकणी, इटकूर, येरमाळा,मोहा, भूम, ईट, अंबी, मानकेश्वर, वालवड, वाशी, तेरखेडा, पारगाव, परंडा, जेवळा बु. अनाळा, सोनारी, अशु आदी परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस झाला. भोंजा ताल. परंडा येथे वीज पडून दोन गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासातही पावसाची हजेरी लागली होती.

जालना जिल्ह्यातील भोकरदन, सिपोरा बाजार, पिंपळगाव रेणूकाई, हस्नाबाद, राजूर, केदारखेडा, जाफ्राबाद, टेंभूर्णी, कुंभारझरी, वरूड, माहोरा, वरूड, दाभाडी, राजूर, केदारखेडा, पिंपळगाव रेणूकाई गावाच्या पूर्व भागात तसेच पुर्वेकडील रेलगाव, मोहळाई, सावंगी, अवघडराव, कोसगाव, माळेगाव आदी विदर्भाच्या सिमेवरील गावात हलका पिकांना अल्प दिलासा देणारा पाउस झाला.

बीड जिल्ह्यातील पाली, टाकळसिंग, चकलांबा, धोंडराई, अंबाजोगाई, घाटनांदूर, लोखंडी सावरगाव, बर्दापूर, पा. ममदापूर आदी मंडळात पावसाची हजेरी लागली.

लातूर जिल्ह्यातील लातूर, गातेगाव, बाभळगाव, चिंचोली, औसा, लामजाना, किल्लारी, मातोळा, भादा, किनीथोट, बेलकूंड, रेणापूर, चाकूर आदी मंडळात पावसाची हजेरी लागली. औसा मंडळात ४३ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड व लोहा तालुक्‍यातील कापशी मंडळात हलका पाउस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com