पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप
पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीनंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने उन्हाळी पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले. पावसाने उघडीप दिल्यानंतर काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या राेपांची उगवण झाली असून, रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. या भागात भातखाचरांमध्ये मशागतींची कामे सुरू आहेत.  मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळशी धरण क्षेत्रात येथे ४७ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. मुळशी वगळता इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे. पिंपळगाव २, डिंभे ६, कळमोडी २, वडीवळे १८, पवना ८, टेमघर १७, वरसगाव २, पानशेत २, गुंजवणी ३, नीरा ७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com