agriculture news in Marathi, Rain possibilities in Central Maharashtra a and Marathwada, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. बुधवार आणि गुरुवारी विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. बुधवार आणि गुरुवारी विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उन्हाचा चटका वाढू लागल्याने मध्य महाराष्ट्रातील नगर, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. उद्यापासून विदर्भात हवामान मुख्यत: कोरडे राहणार असल्याने तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मंगळवार (ता. १७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.२, नगर ४१.८, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४०.२, नाशिक ३८.५, सांगली ३८.२, सातारा ३८.८, सोलापूर ४०.३, मुंबई ३२.८, अलिबाग ३१.९, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३३.७, आैरंगाबाद ४०.२, परभणी ४०.५, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ४३.७, गोंदिया ३९.८, नागपूर ४२.०, वर्धा ४१.५, यवतमाळ ४०.५.

अनेक ठिकाणी गारपीट
राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली. राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी (जि. सातारा) येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील संगमनेर, कर्जत आणि पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली. सिन्नर तालुक्यात (जि. नाशिक) अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पुणे, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली. वादळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे नुकसान झाले तसेच झाडांची पडझड झाली. गुढे पाचगणी पठारावर (जि. सांगली) सोमवारी (ता. १६)  सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सुमारे दीड ते दोन तास पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्याने गुढे पाचगणी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...