agriculture news in Marathi, rain possibilities Central Maharashtra, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018

पुणे ः मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भागात मंगळवारी (ता. ६) हवामान ढगाळ होते. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला असून, कमाल तापमानातही किंचित वाढ झाली आहे. उन्हाचा चटका सकाळपासून जाणवू लागला आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या भागांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

पुणे ः मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भागात मंगळवारी (ता. ६) हवामान ढगाळ होते. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला असून, कमाल तापमानातही किंचित वाढ झाली आहे. उन्हाचा चटका सकाळपासून जाणवू लागला आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या भागांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

छत्तीसगडचा उत्तर भाग ते कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. कोमोरीन भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तर भारतातील हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम ते छत्तीसगड या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर आसामच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढउतार होत आहे.

गुरुवार (ता. ८) ते शनिवार (ता.१०) पर्यंत उत्तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही सोमवार (ता. १२) पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहील.  

सध्या दिवसभर ऊन, तर मध्यरात्रीपासून हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे काही भागात सकाळी धुके पडत आहे. मंगळवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत भिरा येथे ४० अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची नोंद झाली. नाशिक येथे १६.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान होते. मंगळवारी (ता. ६) दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत आकाश निरभ्र होते. त्यामुळे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली.

कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

मंगळवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यत नोंदविलेले कमाल व कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः  
मुंबई ३१.० (२४.०), सांताक्रूझ ३२.६ (२१.६), अलिबाग ३१.२ (२३.२), रत्नागिरी ३२.३ (२१.९), डहाणू ३१.० (२३.५), भिरा ४०.०, पुणे ३४.७ (१७.६), नगर (१६.६), जळगाव ३६.६ (१८.४) , कोल्हापूर ३५.० (२१.५), महाबळेश्वर २९.६ (१८.०), मालेगाव ३५.४ (१८.८), नाशिक ३५.० (१६.४), सांगली ३६.० (२०.१), सातारा ३५.० (१८.८), सोलापूर ३७.५ (२२.४), उस्मानाबाद ३५.२, औरंगाबाद ३५.३ (१९.२), परभणी ३७.९ (१९.१), नांदेड ३९.० (२२.०), अकोला ३८.५ (२०.१), अमरावती ३५.६ (२१.६), बुलडाणा ३४.५ (२०.७), ब्रह्मपुरी (१७.२), चंद्रपूर ३७.६ (२२.८), गोंदिया ३४.४ (१९.५), नागपूर ३६.६ (२०.०), वाशीम ३७.८ (१९.०), वर्धा ३७.९ (२०.६), यवतमाळ ३७.५ (२२.५).

इतर अॅग्रो विशेष
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...