agriculture news in marathi, rain possibilities in few places, Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

पुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६) दुपारपासून राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, सातारा, सोलापूरसह मध्य महाराष्ट्र आणि जालना, बीड, उस्मानाबादसह मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. साेमवारी सकाळपासून विदर्भ, मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती. आज (ता. १८) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६) दुपारपासून राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, सातारा, सोलापूरसह मध्य महाराष्ट्र आणि जालना, बीड, उस्मानाबादसह मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. साेमवारी सकाळपासून विदर्भ, मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती. आज (ता. १८) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे आज (ता. १८) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. अोडिशा, आंध्र प्रदेशकडे सकरत असलेली ही प्रणाली गुरुवारपर्यंत (ता. २०) आणखी तीव्र होणार आहे. समुद्र खवळणार असल्याने ओडिशा अाणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशावरून वायव्येकेडे सरकणार असल्याने २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर धरण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ५.८ किलोमीटर उंचीवर आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने राज्यासह दक्षिण भारतात पाऊस पडत आहे. राज्याच्या तापमानातही चढ-उतार होत असून, चंद्रपूर येथे उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

सोमवारी (ता. १७) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : कृषी विभाग) : 
  कोकण : अलिबाग १६, रामरज १२, खामगाव १४, कळकवणे १७.
  मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ४१, साक्री १७, कसारे १२, रोषणमाळ १३, चुलवड १०, खुंटामोडी १५, रावेर ११, चोपडा २९, भडगाव १९, वाकी १४, भाळवणी १३, सुपा १४, पळशी १०, कर्जत ४५, कोंभळी १४, ढोर जळगाव २३, मिरी २०, चांदा ५०, घोडेगाव ४९, सोनई ३१, वडाळा ३१, ब्राह्मणी ८३, समनापूर १०, पिंपरणे २१, टाकळीभान २०, शिर्डी १५, लोणी ११, बाभळेश्‍वर १८, पणदरे ११, लोणी १०, काटी १०, होटगी ३५, आगळगाव १६, टेंभुर्णी ३२, करमाळा ११, जेऊर ३५, कोर्टी २०, उमरड १७, बामणोली ४६, मायणी २५, निमसोड २६, कातरखटाव ५८, दहिवडी २५, मलवडी ३८, गोंदावले ४०, कुक्‍कुडवाड ३२, मार्डी २४, लामज १२, कुंभारी १८, लेंगरे ४५, विटा २७, येळवी १८, आटपाडी १४.
  मराठवाडा : पाचोड १०, चिंचोली ११, करंजखेड २२, शेवळी १२, परतूर १२, सातोणा ३५, ढोकसळ, पाटोदा ३८, दासखेड १८, नळगीर १३, सालगारा १९, सावरगाव २१, जावळा २५, मानकेश्‍वर ३४, वालवड १०, चुडवा २६.
   विदर्भ : मेहकर ११, अंजनी १३, साखरखेर्डा १०, मंगरूळ १३.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...