नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
अॅग्रो विशेष
पुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. सोमवारी दुपारनंतर बुलडाणा, अकोला, वाशिमसह पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढग गोळा झाले होते. आज (ता.२५) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. २४) दक्षिण हरियाणा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र होते. यामुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, महाराष्ट्रात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. विदर्भासह अनेक भागांत ३० अंशांच्या खाली घसरलेले तापमान पुन्हा वाढू लागले आहे. सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांमध्ये परभणी येथे उच्चांकी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
आजपासून (ता. २५) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, महाराष्ट्रासह मध्य भारतातील तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.४, जळगाव ३४.०, कोल्हापूर ३०.६, महाबळेश्वर २४.४, मालेगाव ३३.४, नाशिक २९.०, सांगली ३०.४, सातारा ३१.१, सोलापूर ३३.५, मुंबई ३२.५, रत्नागिरी ३०.९, डहाणू ३३.३, आैरंगाबाद ३१.८, परभणी ३४.६, नांदेड ३१.०, अकोला ३२.८, अमरावती ३२.४, बुलडाणा ३१.६, चंद्रपूर ३३.०, गोंदिया ३१.४, नागपूर ३१.७, वर्धा ३२.६, यवतमाळ ३२.०.
- 1 of 287
- ››