तुरळक ठिकाणी आज पावसाचा अंदाज

तुरळक ठिकाणी आज पावसाचा अंदाज
तुरळक ठिकाणी आज पावसाचा अंदाज

पुणे: राज्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाचा ताप वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० ते ३५ अंशांच्या अासपास असल्याने उन्हाचा चटकाही कायम आहे. पावसाला पोषक हवामान तयार हाेत असून, आज (ता.१५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी; तर रविवारी (ता. १६) काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे स.िक्रय असलेल्या मॉन्सूनचा आसाचा पूर्व भाग दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. यातच पुढील आठवड्यात मंगळवारी (ता. १८) बंगालच्या उपसागरात कमी दाबचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व किनारपट्टीवर समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, राजस्थान आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, या भागातून मॉन्सून लवकरच माघारी फिरण्याची शक्यता आहे.   राज्याच्या तापमानात झालेली वाढ कायम असून, शुक्रवारी (ता. १४) दुपारी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. आज राज्यात हलक्या पावसाची शक्यता असून, रविवारी (ता.१६) राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  शुक्रवार (ता.१४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.७, जळगाव ३३.०, कोल्हापूर ३०.९, महाबळेश्‍वर २२.०, मालेगाव ३३.२, नाशिक २९.१, सांगली ३२.४, सातारा ३०.१, सोलापूर ३५.२, मुंबई ३१.५, अलिबाग ३१.०, रत्नागिरी ३०.२, डहाणू ३१.५, आैरंगाबाद ३१.२, परभणी ३३.३, नांदेड ३३.०, अकोला ३४.१, अमरावती ३२.४, बुलडाणा २८.५, चंद्रपूर ३५.०, गोंदिया ३२.३, नागपूर ३३.६, वर्धा ३४.०, यवतमाळ ३२.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com