agriculture news in Marathi, rain possibilities in few pleases, Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पुणे ः  पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. येत्या आठवडाभर कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

पुणे ः  पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. येत्या आठवडाभर कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

राज्यात जूनमध्ये दहा ते वीस या दरम्यान पावसाचा खंड पडला होता. त्यानंतर पावसास चांगली सुरवात झाली होती. जुलैपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. यंदाही २२ आॅगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. गेल्यावर्षीही जुलै आॅगस्टमध्ये पावसाने सुमारे ५० ते ५५ दिवस विश्रांती घेतली होती.

यंदाही तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पाठ फिरवल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसावरच अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या साप्तहिक अहवालानुसार पंधरा आॅगस्टपर्यंत देशाच्या उत्तर भागात माॅन्सून अधिक सक्रिय राहणार आहे. उत्तर भागात माॅन्सून सरकल्याने या भागात कमी दाबाचे अधिक क्षेत्र तयार होईल. त्यामुळे उत्तरेकडील राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य भारतात माॅन्सून सक्रिय होण्यासाठी फारशी अनुकूल स्थिती नसल्याने पावसाने दडी मारली आहे. 

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः (मिलिमीटरमध्ये)
कोकण ः लांजा ५०, माथेरान ४०, भिरा, जव्हार, कुडाळ, मंडणगड, म्हसळा ३०, दोडा मार्ग, मोखेडा, राजापूर, रत्नागिरी, शहापूर २० 
मध्य महाराष्ट्र ः राधानगरी ६०, गगनबावडा, महाबळेश्वर ५०, लोणावळा ४०, इगतपुरी ३०, चंदगड, पाटण २०
 मराठवाडा ः चाकूर ३०, देवणी, रेणापूर, उदगीर १०,
विदर्भ ः चिमूर ३०, धारणी २०, आर्वी, चिखलदरा, गोंदिया, हिंगणघाट, कुही, सालेकसा, शिंदेवाही, वर्धा १०

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...