agriculture news in marathi, rain possibilities from Friday, Maharashtra | Agrowon

शुक्रवारपासून पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पुणे: बंगालच्या उपसागरात उद्या (ता. १८) कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याने राज्यात शुक्रवारपासून (ता. २१) पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली असून, तापमानातही वाढ झाली आहे. रविवारी (ता. १६) सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. 

पुणे: बंगालच्या उपसागरात उद्या (ता. १८) कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याने राज्यात शुक्रवारपासून (ता. २१) पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली असून, तापमानातही वाढ झाली आहे. रविवारी (ता. १६) सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. 

बर्मा देशाच्या दक्षिण भागात असलेल्या ‘मर्तबान’च्या आखातमध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्वमध्य बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. चक्राकार वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे उद्या (ता. १८) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांलगतच्या समुद्रात तीन ते चार दिवस प्रतिकूल सागरी स्थिती राहणार आहे. 

आजपासून (ता. १७) गुरुवारपर्यंत (ता. २०) ओडिशा अाणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशावरून सरकणार असल्याने २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गुरुवारपर्यंत (ता. २०) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, रविवारी असलेल्या ढगाळ हवामानामुळे तापमानात काहीशी घट होणार आहे. 

रविवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६, कोल्हापूर ३१.६, महाबळेश्‍वर २१.८, मालेगाव ३३.२, नाशिक ३१.३, सांगली ३३.४, सातारा ३१.१, सोलापूर ३६.२, सांताक्रुज ३२.१, अलिबाग ३१.८, रत्नागिरी ३१.६, डहाणू ३१.६, आैरंगाबाद ३१.०, परभणी ३३.६, नांदेड ३१.०, अकोला ३४.७, अमरावती ३३.२, बुलडाणा २८.६, चंद्रपूर ३५.६, गोंदिया ३३.०, नागपूर ३४.१, वर्धा ३५.०, यवतमाळ ३३.५.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...