agriculture news in Marathi, rain possibilities in Kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे : मॉन्सूनचा प्रवाह मंदावल्यानंतर राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली अाहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडत अाहे. मंगळवारपर्यंत (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : मॉन्सूनचा प्रवाह मंदावल्यानंतर राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली अाहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडत अाहे. मंगळवारपर्यंत (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

अांध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास पोषक स्थिती आहे. यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पूर्व भारतात दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा आहे. तर दक्षिण भारतात असलेल्या वाऱ्यांच्या पूर्व पश्‍चिम जोड क्षेत्रामुळे केरळसह दक्षिण भारतात पावसाने दणका दिला आहे. 

दरम्यान, कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत माॅन्सून सक्रिय होऊन सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह केरळ, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत (ता. १४) तर विदर्भात आज (ता. १२) आणि गुरुवारी (ता. १५) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज आहे. तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र खवळण्याची शक्यता असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोलीसह पूर्व विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर कोकणात हलका ते मध्यम पाऊस पडला तर मराठवाड्यात पावसाची दडी कायम होती.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग)
कोकण : ठाणे २८, नेरळ ३०, कळंब २५, जांभूळपाडा २८, महाड २१, खारवली २२, माणगाव २२, इंदापूर २१, गोरेगाव २२, लोनेरे २६, खेर्डी २४, मार्गताम्हाणे ३२, रामपूर २०, कळकवणे ३४, शिरगांव ३५, बुरोंडी २०, वेळवी २१, तळवली २५, खेडशी २५, कोंडगाव ३८, देवळे २०, देवरुख २६, अंबोली ५५, कसा २२, तळवडा ३५.
मध्य महाराष्ट : धारगाव २५, महाबळेश्‍वर ६१, तापोळा ७६, लामज ८८, करंजफेन ३३, मलकापूर २४, आंबा ६९, राधानगरी २४, साळवण २४, चंदगड २९, नारंगवाडी, माणगाव, कोवाड, तुर्केवाडी, हेरे.
विदर्भ : चिखलदरा २०, वडनेर २८, वरुड २०, गिरोली ३०, हिंगणघाट २६, वाघोली २६, सावळी २८, कानदगाव २३, गोंदिया ३०, काट्टीपूर ३०, चांदनखेडा २३, चिमूर ३२, नेरी २२, मासाळ ३६, कोपर्णा ४८, जेवती ४६, पाटण ४७, सिरोंचा ७८, बामणी ४६, पेंटीपका ६७, असारळी ६९.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...