agriculture news in marathi, rain possibilities in Kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

काेकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

पुणे : माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशाच्या वायव्य भागातून वारे परतले आहेत. राज्यात मॉन्सूनचे अस्तित्व असून, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. गुरुवारपर्यंत (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ वाढली असून, जळगाव येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  

पुणे : माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशाच्या वायव्य भागातून वारे परतले आहेत. राज्यात मॉन्सूनचे अस्तित्व असून, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. गुरुवारपर्यंत (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ वाढली असून, जळगाव येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  

गुरुवारपर्यंत पूर्व आणि मध्य भारतातील आणखी काही भागातून माॅन्सूनची माघार शक्य आहे. लक्षद्वीप आणि मालदिव बेटांवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच अरबी समुद्रामध्ये शनिवारपर्यंत (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असल्याने राज्यातील वाऱ्यांची दिशा बदलू लागली आहे. त्यामुळे पोषक हवामान तयार होत असल्याने राज्यात विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. दुपारनंतर कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात ढग जमा झाले होते. राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ वाढली असून, अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले आहे. जळगावसह मालेगाव, सोलापूर, सांताक्रूज, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, यवतमाळ येथे तापमान ३६ अंशांवर गेल्याने उन्हाची ताप वाढली आहे. 

मंगळवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.९, नगर ३४.६, जळगाव ३७.२, कोल्हापूर ३२.८, महाबळेश्‍वर २८.०, मालेगाव ३६.८, नाशिक ३४.४, सांगली ३३.०, सातारा ३२.७, सोलापूर ३६.८, सांताक्रूज ३६.८, अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.४, डहाणू ३४.२, आैरंगाबाद ३४.८, परभणी ३५.६, नांदेड ३४.५, बीड ३६.२, अकोला ३६.१, अमरावती ३४.८, बुलडाणा ३३.६, ब्रह्मपुरी ३६.३, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३४.५, नागपूर ३५.६, वर्धा ३५.०, यवतमाळ ३६.०.

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्राेत - कृषी विभाग) : कोकण : बिरवडी २२, मार्गताम्हाणे २५, रामपूर २०, वाहल २१, सावर्डे २६, असुर्डे २२, शिरगाव ६८, अंबवली ४६, धामनंद ३२, पाली २२, फणसावणे २५, तुलसानी २७, राजापुर २४, सवंडल २९, कोंडिया ३२, लांजा ४५, पुनस ४१, साडवली ३८. मध्य महाराष्ट्र : गिरनारे ३३, हर्सूल २२, कोळे २०, उंडाळे २१, काले २२, लामज ३०, गडहिंग्लज २९, हलकर्णी ३०, महागाव २८, कोवाड २२.

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...