agriculture news in marathi, rain possibilities in Kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

समुद्रातील वादळी स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

पुणे मॉन्सून परतल्यानंतर राज्यात सुरू असलेला वादळी पाऊसही थांबला आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता राज्यात पावसाची उघडीप होती. अरबी समुद्रातील वादळी स्थितीमुळे उद्यापासून (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

पुणे मॉन्सून परतल्यानंतर राज्यात सुरू असलेला वादळी पाऊसही थांबला आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता राज्यात पावसाची उघडीप होती. अरबी समुद्रातील वादळी स्थितीमुळे उद्यापासून (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र दोन दिवसांपासून राज्यातील पाऊस थांबला आहे. आज (ता. ७) राज्यात निरभ्र व कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होत असल्याने पोषक हवामान होऊन कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

कमाल तापमानात वाढ झाल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील डहाणू येथे उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे असून, जळगाव, मालेगाव, सांताक्रूज, रत्नागिरी, ब्रह्मपुरी येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंदविले गेल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. 

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.९, जळगाव ३६.४, कोल्हापूर ३१.२, महाबळेश्‍वर २६.०, मालेगाव ३६.०, नाशिक ३२.३, सांगली ३१.९, सातारा ३०.६, सोलापूर ३५.१, सांताक्रुज ३६.१, अलिबाग ३४.७, रत्नागिरी ३६.०, डहाणू ३७.८, आैरंगाबाद ३३.२, परभणी ३५.०, नांदेड ३५.०, अकोला ३५.६, अमरावती ३५.४, बुलडाणा ३४.५, ब्रह्मपुरी ३६.५, चंद्रपूर ३५.६, गोंदिया ३४.५, नागपूर ३४.९, वर्धा ३४.९, यवतमाळ ३४.५.

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...