agriculture news in Marathi, rain possibilities in Kokan and central Maharashtra till Sunday, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या सुरवातीपासून कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत अाहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये या भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळी हवामान आणि ढगाळ हवामानामुळे तापमानातही चढ - उतार होत आहेत. रविवारपर्यंत (ता.२१) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, विदर्भात मुख्यत: कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली अाहे.   

पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या सुरवातीपासून कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत अाहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये या भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळी हवामान आणि ढगाळ हवामानामुळे तापमानातही चढ - उतार होत आहेत. रविवारपर्यंत (ता.२१) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, विदर्भात मुख्यत: कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली अाहे.   

शुक्रवारी सकाळपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. राज्यात दिवसाच्या तापमानाचा पारा ३४ अंशांच्या वर असून, दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. रात्रीच्या तापमानात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले अाहे. जळगाव येथे ३६.४ राज्यातील उच्चांकी अंश सेल्सिअस, तर परभणी येथे राज्यातील नीचांकी १६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

थायलंड, आखात अाणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत अाहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत (ता. २२) उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) परतीसाठी पोषक स्थिती असून, उद्यापर्यंत (ता.२१) मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

शुक्रवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.९(२०.७), नगर - (२०.०), जळगाव ३६.४(२०.२), कोल्हापूर ३१.१(२१.०), महाबळेश्‍वर २५.७(१६.६), मालेगाव ३५.४(२१.४), नाशिक ३३.९(१८.६), सांगली ३३.२(२०.७), सातारा ३१.३(२०.४), सोलापूर ३४.८(२२.०), सांताक्रुझ ३३.० (२२.६), अलिबाग ३१.७(२३.३), रत्नागिरी ३२.५(२२.३), डहाणू ३३.० (२४.५), औरंगाबाद ३४.८(१९.०), परभणी ३४.७(१६.४), नांदेड ३५.०(२०.५), अकोला ३५.९(२१.०), अमरावती ३६.४(२०.०), बुलडाणा ३४.०(२०.२), चंद्रपूर ३५.०(२२.६), गोंदिया ३३.८(२०.६), नागपूर ३४.६(१९.२), वर्धा ३५.४(१९.८), यवतमाळ ३६.०(२०.०).

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्राेत - कृषी  विभाग) : 
रायगड : पनवेल ३७, ओवले २५, कर्नाळा २६, वावशी २३, उरण २५, खोपोली ३४, पेण ३५, हमारपूर ३५, कामर्ली ४६, रोहा ३६, नागोठणे २५, कोंडवी २५. 
रत्नागिरी : मार्गताम्हाणे २०, वाहल ३६, असुर्डे ३४, कळकवणे ६७, आंबवली २३, दाभील २०, तळवली २०, पाटपन्हाळे २४, रत्नागिरी २७, खेडशी २०, जयगड २३, मुलगुंड २२, तरवल २६, पाली २१, कडवी २१, म्हाबळे ३८, तेऱ्हे ४९, जैतापूर २३, लांजा २१, भांबेड ७१, पुनास ३५, सातवली २८, विलवडे ४२. 
सिंधुदुर्ग : म्हापण ३१, कणकवली ५५, सांगवे ५६, नांदगाव ४८, वागदे ५३, माणगाव २१. 
पुणे : किकवी २६, आंबवडे ४४, सणसर ३२, वाल्हा २१.
सातारा : केळघर २०, फलटण २३, राजळे २०, तापोळा २५, लामज ४७.
कोल्हापूर : निगवे २०, बालिंगे ३७, काडगाव २८, गवसे २२, चंदगड २२, नारंगवाडी ३०.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...