agriculture news in marathi, rain possibilities in kokan and west maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू असतानाच रात्रीचे तापमान कमी होऊ लागले आहे. पावसाला पोषक हवामानामुळे अरबी समुद्रात किनाऱ्यालगत ढगांची दाटी असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ हवामान आहे. शुक्रवारपर्यंत (ता.१९) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू असतानाच रात्रीचे तापमान कमी होऊ लागले आहे. पावसाला पोषक हवामानामुळे अरबी समुद्रात किनाऱ्यालगत ढगांची दाटी असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ हवामान आहे. शुक्रवारपर्यंत (ता.१९) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात उन्हाचा चटका कायम असून, मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे उच्चांकी ३७.५ अंश सेल्सिअस, तर नगर येथे राज्यातील नीचांकी १५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे दक्षिण कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारी दुपारी या भागात ढग जमा झाले होते. 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) ६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह बहुतांशी देशातून माघार घेतल्यांनतर परतीचा प्रवास मंदावला आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मॉन्सूनचे अस्तित्व असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. साधारणत: १५ ऑक्टोबर रोजी देशभरातून परतणारा मॉन्सून यंदा अद्यापही परतलेला नाही. दक्षिणेकडील राज्यात अद्याप पावसाने जोर धरलेला नसून, पाऊस सुरू झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे देशभरातून परतल्याचे जाहीर करण्यात येईल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

मंगळवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.१ (१८.१), नगर - (१५.६), जळगाव ३७.० (१८.२), कोल्हापूर ३३.१(२२.१), महाबळेश्‍वर २८.० (१७.०), मालेगाव ३६.४ (२०.६), नाशिक ३३.८ (१६.९), सांगली ३४.३ (१९.८), सातारा ३३.४ (१७.३), सोलापूर ३६.५ (२१.८), सांताक्रुझ ३७.५ (२३.४), अलिबाग ३६.५ (२४.०), रत्नागिरी ३४.८ (२३.९), डहाणू ३४.७ (२३.७), आैरंगाबाद ३४.४ (१७.४), परभणी ३५.६ (१६.४), नांदेड - (२०.०), उस्मानाबाद - (१४.५), अकोला ३६.२ (२०.०), अमरावती ३६.० (१८.८), बुलडाणा ३४.० (२०.४), चंद्रपूर ३५.६ (२१.४), गोंदिया ३३.४ (१९.३), नागपूर ३४.७ (१७.२), वर्धा ३४.५ (१७.६), यवतमाळ ३६.० (१९.०).

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...