agriculture news in marathi, rain possibilities in Marathwada, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पुणे : राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका, तर दुपारनंतर ढग जमा होऊन सायंकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, काेल्हापूर तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

राज्याचा उन्हाचा चटकाही वाढत असून, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांची, तर मराठवाड्यात २ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. 

पुणे : राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका, तर दुपारनंतर ढग जमा होऊन सायंकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, काेल्हापूर तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

राज्याचा उन्हाचा चटकाही वाढत असून, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांची, तर मराठवाड्यात २ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. 

बुधवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. साेलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर अधिक होता. हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी लाभदायक ठरणार आहे.  

बुधवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६, नगर ३४.८, जळगाव ३४.२, महाबळेश्‍वर २५.७, मालेगाव ३५.८, नाशिक ३१.३, सांगली ३४.४, सातारा ३३.९, सोलापूर ३६.३, मुंबई ३२.२, अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३१.८, डहाणू ३२.०, आैरंगाबाद ३३.८, परभणी ३३.५, नांदेड ३४.०, बीड ३४.८, अकोला ३३.७, अमरावती ३३.०, बुलडाणा २९.२, ब्रह्मपुरी ३४.२, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३३.०, नागपूर ३४.०, वर्धा ३३.९, यवतमाळ ३३.०.
मंगळवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) : 
मध्य महाराष्ट्र : सुर्डी ४२, मैंदर्गी १३, वागदरी १६, माढा १५, कुर्डूवाडी ६४, रोपळे १६, मोडनिंब १४, सालसे २५, भंडीशेगाव १४, भाळवणी १४, भोसे १४, आनेवाडी १२, शेणोली २२, होळ २२, तरडगाव ४६, भुईज १०, बुधगाव ३७, मिरज ५५, सांगली ६२, कसबे डिग्रज ६५, मालगाव २७, कवलापूर २५, संख २२, जत १८, डफळापूर १६, कुंभारी १०, विटा ११, सावळज २७, धालगाव २९, देशिंग १५, कवठेमहांकाळ १२, हिंगणगाव ४५, अंकलखोप २९, हातकणंगले २२, हेर्ले ३०, रुई १२, वडगाव १२, वाठार १७, शिरोळ ३५, नांदणी १८, जयसिंगपूर ३८, शिरढोण ११, खडकेवाडा १४, आजरा १०.
मराठवाडा : बाळानगर २७, पानचिंचोली १८, कासार बालकुंड १३, नळदुर्ग २१, डाळिंब २४, मुरूम ११, येवती २२, चांडोळा २५, कंधार १८, कुरुळा २२, भोकर १३, मातूळ १०, माळेगाव २२. 

माॅन्सूनच्या परतीला पोषक स्थिती
मॉन्सूनच्या प्रवाहातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने राजस्थान, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मुख्यत: कोरडे हवामान आहे. आजपासून (ता. २६) वायव्य भारतात खालच्या थरांतील वाऱ्यांची दिशा बदलणार आहे. मॉन्सून वारे माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार होणार असल्याने शनिवारपासून (ता.२९) परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...