agriculture news in Marathi, rain possibilities in south area , Maharashtra | Agrowon

राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे : महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापर्यंत (ता. २५) राज्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. 

पुणे : महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापर्यंत (ता. २५) राज्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. 

बंगालच्या उपसागात म्यानमारच्या दक्षिणभागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहेत. तर मंगळवारी (ता. २३) उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. तापमानात वाढ झाल्याने अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने मराठवाड्यासह, दक्षिण मध्य महाराष्ट्र, काेकणात अंशत: ढगाळ हवामान होते. आज (ता. २४) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम असून, रात्रीच्या किमान तापमान कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अमरावती येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर रात्रीच्या तापमानात झाल्याचे दिसून आले. नाशिक येथे नीचांकी १५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.३ (१८.६), नगर -(१८.०), जळगाव ३७.० (१८.०), कोल्हापूर ३३.२ (२१.९), महाबळेश्‍वर २८.० (१७.५), मालेगाव ३५.८ (१८.४), नाशिक ३५.२ (१५.१), सांगली ३४.३ (१९.९), सातारा ३३.६ (१९.४), सोलापूर ३५.१ (२३.३), सांताक्रूझ ३५.७ (२१.४), अलिबाग ३३.८ (२२.४), रत्नागिरी ३५.२ (२३.५), डहाणू ३३.३ (२०.९), आैरंगाबाद ३५.२ (१७.०), परभणी ३६.२ (१८.०), नांदेड ३६.० (२१.०), उस्मानाबाद -(१७.७), अकोला ३७.१ (१८.८), अमरावती ३७.२ (१८.६), बुलडाणा ३२.५ (१९.६), चंद्रपूर ३५.६ (२३.२), गोंदिया ३५.८ (२०.०), नागपूर ३६.५ (१५.६), वर्धा ३६.६ (१७.६), यवतमाळ ३६.५ (१८.४).

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...