agriculture news in Marathi, rain possibilities in south Kokan and west Maharashtra , Maharashtra | Agrowon

दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली अाहे. अरबी समुद्रात असलेल्या या प्रणालीमुळे आजपासून (ता. १८) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यातील किमान तापमानात थोडीशी वाढ झाली अाहे. 

पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली अाहे. अरबी समुद्रात असलेल्या या प्रणालीमुळे आजपासून (ता. १८) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यातील किमान तापमानात थोडीशी वाढ झाली अाहे. 

राज्याच्या तापमानात १ ते ३ अंशांची वाढ झाली असून, पुणे येथे राज्यातील नीचांकी ११.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील ‘गज’ वादळ निवळून शनिवारी अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. समुद्रात जाताच या कमी दाब क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढू लागली अाहे. लक्षद्वीप बेटांजवळ आज (ता. १८) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत अाहेत.

केरळच्या किनाऱ्यालगतच्या भागात जारेदार वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला अाहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ चक्राकार वारे वाहत असून, आज या भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.९ (-२), जळगाव १२.४ (-३), कोल्हापूर २०.१ (३), महाबळेश्‍वर १६.६ (२), मालेगाव १५.४ (१), नाशिक १२.२ (-१), सांगली १७.१ (१), सातारा १४.४ (-२), सोलापूर १९.४ (२), सांताक्रूझ १९.६ (-१), अलिबाग २१.५ (१), रत्नागिरी २१.२ (०), डहाणू २१.० (०), आैरंगाबाद १३.७ (०), परभणी १४.५ (-२), नांदेड १७.० (२), उस्मानाबाद १६.९, अकोला १५.५ (-१), अमरावती १७.२ (०), बुलडाणा १६.३ (०), चंद्रपूर १८.२ (२), गोंदिया १५.४ (-१), नागपूर १३.६ (-२), वर्धा १५.२ (-१), यवतमाळ १४.२ (-३).

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...