त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
अॅग्रो विशेष
पुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने गारठा वाढला आहे. दक्षिण भारतात असलेल्या ‘गाजा’ चक्री वादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून (ता. १८) हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने गारठा वाढला आहे. दक्षिण भारतात असलेल्या ‘गाजा’ चक्री वादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून (ता. १८) हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी (ता.१६) नाशिक आणि पुणे येथे नीचांकी तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात निरभ्र हवामानामुळे दुपारच्या वेळी तापमान वाढत आहे. मात्र, पहाटे गार वारे, धुक्यासह गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान १५ अंशांच्या जवळपास आले आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘गाजा’ चक्री वादळ शुक्रवारी (ता. १६) तमिळनाडूमध्ये आदिरामपुरमच्या पश्चिमेकडे ९५ किलोमीटर, तर कोडाईकनालच्या पूर्वेकडे ११० किलोमीटर अंतरावर घोंगावत होते.
चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असून, आज ते अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे उद्यापासून (ता.१८) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. रविवारपर्यंत (ता. १८) बंगाच्या उपसागरात नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
शुक्रवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.८(-१), जळगाव १२.०(-४), कोल्हापूर १७.८(०), महाबळेश्वर १६.०(१), मालेगाव १५.४ (१), नाशिक ११.८(-२), सांगली १४.२(-३), सातारा १४.४(-२), सोलापूर १५.८(-३), सांताक्रूझ १९.२ (-२), अलिबाग २१.०(०), रत्नागिरी २०.३(-१), डहाणू २१.०(०), आैरंगाबाद १२.५(-२), परभणी १४.४ (-३), नांदेड १४.०(-१), उस्मानाबाद १७.४, अकोला १५.०(-२), अमरावती १६.४(-२), बुलडाणा १६.४ (-१), चंद्रपूर १६.६(-१), गोंदिया १५.२(-१), नागपूर १३.५(-३), वर्धा १५.२(-२), यवतमाळ १४.४ (-३).
- 1 of 287
- ››