agriculture news in Marathi, rain possibilities in state, Maharashtra | Agrowon

राज्यावर वादळी पावसाचे सावट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे : कोल्हापूर, सांगलीसह राज्यात गुरुवारी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरात जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाली. शुक्रवारी सकाळपासूनच राज्यात ढग गोळा झाले होते. रविवारपर्यंत (ता. ८) राज्यावर विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचे सावट कायम राहणार आहे, तर मंगळवारपर्यंत (ता. १०) राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : कोल्हापूर, सांगलीसह राज्यात गुरुवारी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरात जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाली. शुक्रवारी सकाळपासूनच राज्यात ढग गोळा झाले होते. रविवारपर्यंत (ता. ८) राज्यावर विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचे सावट कायम राहणार आहे, तर मंगळवारपर्यंत (ता. १०) राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी (ता. ५) दुपारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहर आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह सुमारे अर्धा तास गारपीट झाली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापुरातील हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यासह विविध भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अाजरा तालुक्यातील माळिंग्रे येथे सर्वाधिक ४० मिलिमीटर, तर अाजरा येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर करवीर तालुक्यातील करवीर येथे २७ मिमी, कसबा बीड २७, निगवे ७ मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

दक्षिण कोकणापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. शुक्रवारी सकाळपासून रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, औरंगाबाद, परभणी, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूरसह राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान झाले होते, तर काही भागांत ऊन- सावल्यांचा खेळ सुरू हाेता. ढगांच्या आच्छादनामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला. मात्र, उकाड्यात वाढ झाली होती. शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंत चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शुक्रवार (ता. ६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, नगर ४१.५, जळगाव ४२.६, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४१.४, नाशिक ३८.१, सांगली ३७.४, सातारा ३८.५, सोलापूर ४०.९, मुंबई ३२.२, रत्नागिरी ३२.२, डहाणू ३४.१, आैरंगाबाद ३९.२, परभणी ४२.०, नांदेड ४०.५, अकोला ४२.७, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९.४, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ३९.४, नागपूर ४०.६, वर्धा ४१.७, यवतमाळ ४१.५.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...