पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे.
अॅग्रो विशेष
पुणे : पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गुरुवारपासून (ता. १७) वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली अाहे. तर विदर्भासह राज्यात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअस राहणार असल्याने उन्हाचा चटकाही कायम राहणार आहे.

मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रात अालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, मंगळवारी सकाळी हे क्षेत्र अधिक ठळक झाले होते. त्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. गुरुवारपर्यंत या कमी दाबक्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार असून, ते आदनच्या खाडीकडे सरकून जाणार आहे.
दरम्यान दक्षिण उत्तर प्रदेशापासून मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय अाहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३७.५, महाबळेश्वर ३२.५, मालेगाव ४२.४, नाशिक ३७.२, सांगली ३७.८, सातारा ३९.३, सोलापूर ४२.२, मुंबई ३४.२,अलिबाग ३५.२, रत्नागिरी ३४.५, डहाणू ३४.४, आैरंगाबाद ४०.५, परभणी ४३.८, अकोला ४३.३, अमरावती ४३.६, बुलडाणा ४१.२, ब्रह्मपुरी ४५.०, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४४.१, वर्धा ४४.०, यवतमाळ ४३.०.
- 1 of 286
- ››