agriculture news in marathi, rain possibilities in state from tomorrow, Maharashtra | Agrowon

राज्यात उद्यापासून पावसाचे संकेत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. दोन दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात आज (ता. १९) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारपासून (ता. २०) कोकण, मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरू होण्याचे संकेत असून, शुक्रवारी (२१) विदर्भ आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. दोन दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात आज (ता. १९) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारपासून (ता. २०) कोकण, मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरू होण्याचे संकेत असून, शुक्रवारी (२१) विदर्भ आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, उद्या (१९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्यानंतरच्या २४ तासांमध्ये त्याची तीव्रता वाढणार आहे. कोकण, गोवा, दक्षिण गुजरात जवळच्या अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ त ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार होत असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडत आहे.  

राज्यातील हवामानात वेगाने बदल होत असून, तापमानातही चढ-उतार होत आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.३, नगर ३२.८, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्‍वर २४.०, मालेगाव ३१.६, नाशिक ३०.४, सांगली ३१.२, सातारा ३१.४, सोलापूर ३०.९, मुंबई ३२.०, रत्नागिरी ३१.९, डहाणू ३२.०, आैरंगाबाद ३०.४, परभणी २७.४, नांदेड ३३.०, अकोला ३५.१, अमरावती ३१.६, बुलडाणा ३०.६, चंद्रपूर ३५.०, गोंदिया ३३.६, नागपूर ३४.२, वर्धा ३५.९, यवतमाळ ३५.५.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला
मॉन्सूनचे अस्तित्व दर्शविणारा कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) विरून गेल्याचे हवामान विभागाने सोमवारी (ता. १७) स्पष्ट केले. यातच राजस्थान, मध्य प्रदेशासह वायव्य भारतातील राज्यांमध्ये कोरडे हवामान आहे. ही स्थिती मॉन्सून माघारी फिरण्यास पोषक स्थिती असल्याचे दर्शवते. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे मध्य आणि वायव्य भारतात पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे मॉन्सूनच्या वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला नसल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...