agriculture news in marathi, rain possibilities in vidarbha and kokan today, Maharashtra | Agrowon

विदर्भ, कोकणात आज पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. या ठळक प्रणालीमुळे आज (ता. ८) विदर्भासह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामानातील बदलामुळे तापमानातही चढ-उतार होत अाहेत.  

पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. या ठळक प्रणालीमुळे आज (ता. ८) विदर्भासह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामानातील बदलामुळे तापमानातही चढ-उतार होत अाहेत.  

मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. गुरुवारी (ता. ६) बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे कोकण, विदर्भात हलक्या पावसाने हजेरी लावली. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुख्यतः पावसाची उघडीप कायम आहे. शुक्रवारी (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने विदर्भ, मराठवाड्यात ढग गोळा झाले होते, तर उर्वरित महाराष्ट्रातही अंशतः ढगाळ हवामान होते. 

राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या जवळपास असून, तापमानात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामानामुळे विदर्भाच्या तापमानात घट झाली आहे. रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली उतरल्याने पहाटे गारठा जाणवू लागला आहे. उस्मानाबाद येथे राज्यातील नीचांकी १३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  

शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.६, जळगाव ३१.६, कोल्हापूर २७.८, महाबळेश्‍वर १९.०, मालेगाव ३०.२, नाशिक २७.३, सांगली २८.९, सातारा २७.६, सोलापूर ३२.७, सांताक्रूझ ३१.३, अलिबाग ३०.९, रत्नागिरी २९.८, डहाणू ३१.४, आैरंगाबाद ३०.०, परभणी ३०.०, नांदेड ३०.०, अकोला २९.६, अमरावती २६.६, बुलडाणा २७.७, चंद्रपूर २९.०, गोंदिया २४.६, नागपूर २४.६, वर्धा २५.०, यवतमाळ २५.५. 

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (स्रोत - कृषी विभाग) :
कोकण : महाड २५, कोंडगाव २८, वैभववाडी २४.
मध्य महाराष्ट्र : लामज ३८, करंजफेन २२, आंबा ४७, 
विदर्भ : सेलू ३३, कन्हान ३०, उमरेड ४४, हेवंती ३९, पाचगाव ४१, मळेवाडा ३७, नंद ४३, भिवापूर ५७, कारगाव ५५, वेलतूर ३८, राजोली ३८, नाकडोंगरी ३०, सिवोरा ४०, पवनी ३०, चिंचळ ३५, आमगाव ४७, पालंदूर ३७, गंगाझारी ४४, रत्नारा ५५, दासगाव ४४, कट्टीपूर ३४, पारसवाडा ४७, तिरोडा ४२, वाडेगाव ३०, ठाणेगाव ३५, गोरेगाव ५८, कुऱ्हाडी ४७, मांगळी ३५, भिशी ३१, शंकरपूर ३३, नेरी ३१, गांभूळघाट ३९, नागभिड ४०, तलोधी ४०, पोंभुर्णा ३६, गडचिरोली ४८, पोरळा ३५, येवती ३६, ब्राह्मणी ३०, अरमोरी ३१, देऊळगाव ३५, जरावंडी ३०, धानोरा ३३, चाटेगाव ३९, पेंढारी ३०.

इतर अॅग्रो विशेष
अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
सहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...
कांदा कोंडीवर उपाय काय?कांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...
कांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...