विदर्भात पावसाची शक्यता

विदर्भात पावसाची शक्यता
विदर्भात पावसाची शक्यता

पुणे ः अरबी समुद्रावरून वाहत असलेले बाष्प विदर्भाच्या काही भागात दाखल झाले आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांत ढगाळ हवामान राहील. आज (गुरुवारी) आणि उद्या विदर्भातील नागपूर, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वाशीम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.   मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान असल्याने बुधवारी (ता. ११) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला. जोरदार वारे, पावसामुळे आंबा, डाळिंब, गहू, कांदा, द्राक्ष पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी साचले होते. सध्या सकाळपासून उन्हाचा पारा वाढत आहे. बुधवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील बीड भागात भागात अचानक दाट ढग गोळा झाले होते. त्यामुळे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. मात्र, उर्वरित भागात काही प्रमाणात हवामान किंचित ढगाळ होते. विदर्भाच्या उत्तर भागात हवामान कोरडे होते. दक्षिण भागातील काही जिल्ह्यांत दुपारनंतर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. कोकणातही हवामान कोरडे होते. त्यामुळे या भागातील कमाल तापमानात किंचित वाढ झाली होती. ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानाबरोबर रात्रीच्याही तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. राज्यातील कमाल तापमान ३२ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. बुधवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ४१.४ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. नगरमध्ये १८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, येत्या दोन दिवसांनंतर पुन्हा उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) ३४.८, अलिबाग ३२.६, रत्नागिरी ३४.२, डहाणू ३२.२, पुणे ३७.१, जळगाव ४१.२, कोल्हापूर ३६.५, महाबळेश्वर ३२.५, मालेगाव ४०.२, नाशिक ३७.८, सांगली ३८.४, सातारा ३७.६, सोलापूर ३९.०, औरंगाबाद ३७.६, परभणी शहर ३९.४, नांदेड ३९.५, अकोला ४१.४, अमरावती ३८.२, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४०.२, गोंदिया ३८.५, नागपूर ३८.४, वाशीम ३९.०, वर्धा ३८.८, यवतमाळ ३९.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com