agriculture news in Marathi, rain possibilities from Wednesday, Maharashtra | Agrowon

राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या प्रवाहात होत असलेले बदल यांमुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. निफाड (जि. नाशिक) येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी (ता. १७) राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने बुधवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. 

पुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या प्रवाहात होत असलेले बदल यांमुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. निफाड (जि. नाशिक) येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी (ता. १७) राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने बुधवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. 

दोन दिवस तापमानात घट झाल्याने राज्याच्या उत्तर भागात गारठा चांगलाच वाढला होता. निफाड येथे तापमान ६ अंशांपर्यंत घसरले होते. तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली आले आहे. सोमवारी (ता. १७) राज्याच्या किमान तापमानात होऊ लागल्याचे दिसून आले आहे. नगर येथे ९.४ अंश, धळे येथील कृषी महाविद्यालयात १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात तापमानात घट झाली असून, नागपूर येथे पारा १० अंशांवर आला. उर्वरित राज्यात किमान तापमानात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळी उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढला आहे. 

 बुधवारी (ता. २०) आणि गुरुवारी (ता. २१) पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.८ (-०.६), नगर ९.४(-४.५), जळगाव १२.२(-२.७), कोल्हापूर १४.९ (-१.८), महाबळेश्‍वर १४.८(०.६), मालेगाव १३.४(०.७), नाशिक ११.१ (-०.६), सांगली १३.४(-२.६), सातारा १३.०(-१.५), सोलापूर १६.७(-१.७), सांताक्रुझ १५.६(-२.९), अलिबाग १६.६(-१.९), रत्नागिरी १६.६(-२.८), डहाणू १६.२(-२.३), आैरंगाबाद १३.२(-१.६), नांदेड १४.० (-१.०), परभणी १५.०(-१.६), अकोला १३.६(-३.१), अमरावती १२.६(-४.६), बुलडाणा १४.४ (-२.६), ब्रह्मपुरी १२.५ (-३.७), चंद्रपूर १५.८(१.७), गोंदिया १२.२(-३.८), नागपूर १०.१(६.१), वर्धा १३.०(-३.३), यवतमाळ १३.०(-४.७).

इतर अॅग्रो विशेष
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...