agriculture news in Marathi, rain possibility in several places, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, विदर्भात गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे ः मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच छत्तीसगडच्या उत्तर भाग ते पश्चिम बंगाल, सिक्कीम या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा तयार झाला होता. गुरुवारी (ता.८) आणि शुक्रवारी (ता.९)  मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

पुणे ः मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच छत्तीसगडच्या उत्तर भाग ते पश्चिम बंगाल, सिक्कीम या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा तयार झाला होता. गुरुवारी (ता.८) आणि शुक्रवारी (ता.९)  मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान आज (मंगळवारी) उद्या (बुधवारी) ढगाळ राहील. त्यामुळे दमटपणा तयार होऊन वातावरणात उकाडा तयार होईल. सोमवारी (ता.६) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील भिरा येथे सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर उस्मानाबाद येथे १५.२ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. 

सध्या गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मात्र, कोल्हापूर परिसरात सकाळी धुक्याची चादर काही प्रमाणात तयार झाली होती. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमा तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

सोमवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेले कमाल व कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः  मुंबई ३१.७ (२३.५), सांताक्रुझ ३१.६ (२०.०), अलिबाग ३२.४ (२१.६), रत्नागिरी ३१.२ (२३.३), डहाणू ३१.४ (२१.०), भिरा ३८.५ (२०.५), पुणे ३५.३ (१८.०), नगर (१७.४), जळगाव ३७.२, कोल्हापूर ३५.२ (२०.०), महाबळेश्वर ३०.९ (१७.२), मालेगाव ३७.२ (२०.२), नाशिक ३४.८ (१७.५), सांगली ३६.० (१८.३), सातारा ३६.० (२१.४), सोलापूर ३८.१ (२१.४), उस्मानाबाद ३५.९ (१५.२), औरंगाबाद ३५.८ (२१.२), परभणी ३८.४ (२०.५), अकोला ३८.०(२२.०), अमरावती ३७.० (२४.०), बुलढाणा ३५.६ (२२.५), ब्रह्मपुरी ३७.८ (१७.९), चंद्रपूर ३८.४ (२२.०), गोंदिया ३७.५ (१८.०), नागपूर ३६.४ (१९.४), वर्धा ३७.५ (२१.५), यवतमाळ ३७.५(२०.४)

इतर अॅग्रो विशेष
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...