agriculture news in Marathi, Rain possibility in state on Friday, Maharashtra | Agrowon

राज्यात शुक्रवारी वादळी पावसाचा इशारा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. गुरुवारपासून (ता. ५) राज्यात सर्वदूर ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, शुक्रवारी (ता. ६) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार वारे, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारपर्यंत राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. 

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. गुरुवारपासून (ता. ५) राज्यात सर्वदूर ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, शुक्रवारी (ता. ६) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार वारे, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारपर्यंत राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती सोमवारी छत्तीसगडकडे सरकली होती. यापासून, उत्तर छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या दक्षिण भागात अंशत: आकाश ढगाळ होते.

गुरुवारनंतर आठवडाभर राज्यात ढगाळ हवामानासह पाऊस पडण्यास पोषक स्थिती आहे. दरम्यान, गुरुवारपासून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होणार असून, शुक्रवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

विदर्भात उन्हाच्या झळा कायम आहेत. मात्र, रविवारी (ता.१) असलेल्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात एक अंशाची घट झाली. तर, उर्वरित महाराष्ट्रात तापमानाचा पारा काहीसा वर गेला होता. सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील नांदेड येथे उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात सर्वच ठिकाणी, तर मालेगाव, सोलापूर, परभणी, नांदेड येथे तापमान ४० अंशांच्या वर होते. 

सोमवारी (ता.२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान  (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३७.८, महाबळेश्वर ३३.०, मालेगाव ४१.२, नाशिक ३८.६, सांगली ३३.४, सातारा ३८.७, सोलापूर ४१.०, मुंबई ३२.०, अलिबाग ३०.४, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३२.६, आैरंगाबाद ३९.२, परभणी ४०.९, नांदेड ४२.५, अकोला ४१.७, अमरावती ४०.४, बुलडाणा ३८.४, चंद्रपूर ४२.०, गोंदिया ४०.४, नागपूर ४१.४, वर्धा ४१.५, यवतमाळ ४१.०.

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...