agriculture news in marathi, rain prediction in konkan, central and south maharashtra | Agrowon

ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमान सरासरीच्या वर गेले असून, राज्यातील थंडी गायब झाली आहे. उद्यापर्यंत (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. १८) सकाळी नागपूर येथे नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमान सरासरीच्या वर गेले असून, राज्यातील थंडी गायब झाली आहे. उद्यापर्यंत (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. १८) सकाळी नागपूर येथे नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, आज (ता. १९) त्याची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. तर बंगालच्या उपसागरात विषुववृत्तीय हिंदी महासागरामध्ये नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, आज त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. आज (ता.१९) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्‍ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.९(२), जळगाव १४.०(-१), कोल्हापूर २२.८(५), महाबळेश्‍वर १७.६(३), मालेगाव १६.२ (२), नाशिक १३.६(०), सांगली २०.५(४), सातारा १९.०(३), सोलापूर २३.५(०), सांताक्रूझ २०.२(-१), अलिबाग २१.३(१), रत्नागिरी २३.३(२), डहाणू २०.७(०), आैरंगाबाद १५.०(१), परभणी १८.४ (२), नांदेड २०.५(५), अकोला १६.६(०), अमरावती १६.८(-१), बुलडाणा १८.० (२), चंद्रपूर २०.०(४), गोंदिया १४.८(-१), नागपूर १४.५(-१), वर्धा १५.५(-१), यवतमाळ १५.४ (-१).

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....