agriculture news in marathi, rain prediction in konkan, central and south maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात वादळी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात दाट ढग असून, मराठवाडा आणि विदर्भातही ढगाळ हवामान होते. आज (ता. २०) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्‍ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात वादळी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात दाट ढग असून, मराठवाडा आणि विदर्भातही ढगाळ हवामान होते. आज (ता. २०) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्‍ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमान मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. गोंदिया येथे नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र निवळत आहे. मात्र बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यातही बुधवारपर्यंत (ता. २१) पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १८.२ (४), नगर १८.० (३) जळगाव १४.२ (-१), कोल्हापूर २२.१ (५), महाबळेश्‍वर १७.२ (३), मालेगाव १९.० (५), नाशिक १६.० (३), सांगली २१.५ (५), सातारा २०.३ (४), सोलापूर २३.८ (६), सांताक्रूझ २१.९ (१), अलिबाग २२.४ (२), रत्नागिरी २४.८ (३), डहाणू २१.२ (१), आैरंगाबाद १९.२ (५), परभणी २३.० (६), नांदेड २३.० (८), अकोला २०.६ (४), अमरावती १९.२ (२), बुलडाणा २१.४ (५), चंद्रपूर २१.४ (५), गोंदिया १४.८ (-१), नागपूर १६.१ (१), वर्धा १८.४ (२), यवतमाळ १९.२ (२).

इतर अॅग्रो विशेष
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...