agriculture news in marathi, Rain prediction till monday in state | Agrowon

राज्यात साेमवारपर्यंत पूर्वमोसमीच्या सरी
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 मे 2018

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत (ता. १४) राज्यात सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. तर विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम राहणार असून, रविवारी (ता. १३) उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
   

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत (ता. १४) राज्यात सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. तर विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम राहणार असून, रविवारी (ता. १३) उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
   
वायव्य राजस्थानपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. तर अरबी समुद्राच्या अाग्नेय भागात २.१ किलोमीटर उंचीवर च्रकाकार वारे वाहत असून, त्यांच्या प्रभावामुळे मंगळवारी (ता. १५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भातील अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, मध्य महाराष्ट्रातील जळगाव मराठवाड्यातील परभणी येथे तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. 

शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.४१, जळगाव ४५.०, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.८, सांगली ३६.२, सातारा ३९.६, सोलापूर ४२.५, मुंबई ३४.६, अलिबाग ३५.८, रत्नागिरी ३५.५, डहाणू ३५.३, औरंगाबाद ४२.०, परभणी ४५.५, अकोला ४४.०, अमरावती ४५.६, बुलडाणा ४४.०, ब्रह्मपुरी ४६.७, चंद्रपूर ४७.३, गोंदिया ४३.२, नागपूर ४४.५, वर्धा ४५.५, यवतमाळ ४५.०.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी
शनिवारी सकाळपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान होते. औरंगाबाद जिल्ह्यातही तुरळक पावसाचा शिडकावा झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे मुसळधार पाऊस पडला. कोकणातील पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंबा पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे. 

उत्तर भारतात आज वादळाची शक्‍यता
उत्तर भारतातील उत्तराखंड, जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत उद्या (रविवारी) वादळ येण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज वर्तवली. राजस्थानच्या काही भागांतही पुढील दोन दिवसांत धुळीचे वादळ येवू शकते, असेही सांगण्यात आले. पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, पश्‍चिम बंगालचा काही भाग, ओडिशा आणि झारखंडमध्ये 50 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्विप आणि केरळमध्येही वादळाची शक्‍यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये आलेल्या वादळामुळे 120पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...