agriculture news in marathi, rain, pune | Agrowon

राज्यात पावसाचा धुमाकूळ
संदीप नवले
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

रविवारी (ता. ८) सकाळपर्यंत राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. राज्यभरात भात, सोयाबीन, मूग, उडदासह भाजीपाल्याचे नुकसान झाले, तर वीज कोसळून जवळपास वीस जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे ः गेल्या दहा ते बारा दिवसांपासून परतीच्या पावसाचे मार्गक्रमण सुरू झाले. राज्यात परतीचा पाऊस दाखल झाला नाही; मात्र हवामानात बदल झाला आहे. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंत राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. राज्यभरात भात, सोयाबीन, मूग, उडदासह भाजीपाल्याचे नुकसान झाले, तर वीज कोसळून जवळपास वीस जणांचा मृत्यू झाला. 

रविवारी सकाळपर्यंत झालेला जोरदार पाऊस व कडाडणाऱ्या विजांमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. किन्हेरी (जि. रायगड) परिसरात वीज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला. नगरमधील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर १२ महिला जखमी झाल्या. इतर ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील कणूर (ता. वाई) येथे एका व्यक्तीचा वीज पडून बळी गेला.

औरंगाबाद जिल्ह्यात ढाकेफळ (ता. पैठण) परिसरातील येळगंगा नदीच्या पुलावरून जात असताना एका कामगाराचा तर देवगाव रंगारी येथेही २२ वर्षांच्या तरुणाचा विजेने बळी घेतला. पैठण तालुक्यातील रहाटगाव शिवारात झाडाखाली थांबलेल्या एका महिलेवर वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली एक महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बीडमध्ये धारूर तालुक्यात चारदरी येथे झाडाखाली थांबलेल्या दहा जणांच्या अंगावर वीज कोसळली. त्यातील पाच जण जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे एका महिलेच्या अंगावर वीज कोसळली. जालना जिल्ह्यातील धोपटेश्वर गावात शेतात काम करत असलेल्या एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. विदर्भातील डोणगाव येथे एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले. भंडारा जिल्ह्यातही एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. 

कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाऊस झाला. त्यामुळे कोकणात काढणीस आलेल्या भाताचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भात खाचरांमध्ये पाणी साचले व पीक आडवे झाले. याचा मोठा फटका भात उत्पादकांना बसला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पाऊस झाला. या पावसाने भाजीपाला तेसच फळबागांचे नुकसान झाले.

खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमधेही अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला. विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठाकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणी केलेल्या व आलेल्या मूग, उडीद सोयाबीन, उसाचे नुकसान झाले.

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...