पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस
संदीप नवले
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने उघडीप दिली. परंतु सायंकाळी ढगांनी चांगलीच गर्दी केल्याने सहा वाजेनंतर अनेक भागांत हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. जुन्नर तालुक्‍यातील राजूर मंडळात सर्वाधिक ६६ मिमी पाऊस झाला. पुंरदर तालुक्‍यात पावसाची उघडीप कायम होती.

पुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने उघडीप दिली. परंतु सायंकाळी ढगांनी चांगलीच गर्दी केल्याने सहा वाजेनंतर अनेक भागांत हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. जुन्नर तालुक्‍यातील राजूर मंडळात सर्वाधिक ६६ मिमी पाऊस झाला. पुंरदर तालुक्‍यात पावसाची उघडीप कायम होती.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. परंतु गेल्या दोन दिवसांपासून
पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. परंतु गुरुवारी (ता.२१) सायंकाळी अनेक ठिकाणी पाऊस पडला. शुक्रवारी दिवसभर पावसाने उघडीप देत सकाळपासून काही
भागांत ऊन पडल्याचे चित्र होते.

गेल्या आठ दिवस झालेल्या पावसामुळे भातपिकाला चांगलाच दिलासा मिळाला. परंतु मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यांतील काही ठिकाणी नुकसानदेखील झाले आहे. पूर्वेकडील दुष्काळी बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड तालुक्‍यांनाही पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. सध्या या भागांतील तूर, कापूस पिके वाढीच्या अवस्थेत असून,बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद ही पिके काढणीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू झाली आहे.

जोरदार पावसामुळे ओढे, नाले तसेच नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली असून, जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. यामुळे येत्या रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना गहू, हरभरा आदी पिके घेता येणार आहेत.

मंडळनिहाय शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी) ः हवेली ः पुणे शहर १२.४, केशवनगर १२, खडकवासला ३, थेऊर ३, भोसरी ८, चिंचवड ६, कळस ५, हडपसर ७.  मुळशी  ः पौड १८, घोटावडे ४७, थेरगाव ५, मळे २९, मुठे १५, पिरंगुट ३०.  भोर ः भोर १२, भोळावडे २५, नसरापूर ३, किकवी ५, वेळू ४,
आंबावडे २७, संगमनेर ९, निगुडघर २२. 

वडगाव मावळ ः वडगाव मावळ ४, तळेगाव ३, काले १३, कार्ला ८, खडकाळा १८, लोणावळा ३०, शिवणे ९,  वेल्हा ः वेल्हा २३, पानशेत १६, विंझर १२, आंबावणे १०. जुन्नर ः जुन्नर ७, नारायणगाव २, राजूर ६६, डिंगोरे ११, आपताळे ३८, ओतूर ८.  खेड ः वाडा १२.४, राजगुरुनगर२.२, कुडे २४, पाइट ४, चाकण २.१.  आंबेगाव ः घोडेगाव १७, आंबेगाव २५, कळंब ३, पारगाव १, मंचर २. शिरूर ः वडगाव २, कोरेगाव २, शिरूर १० बारामती ः माळेगाव २, मोरगाव ६, उंडवडी ४.  इंदापूर ः भिगवण २, इंदापूर २२.४, लोणी २०, निमगाव ४, अंथुर्णे २, सणसर १.  दौंड ः यवत ३, रावणगाव ५, दौंड १.

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...