agriculture news in marathi, Rain slows in Kashmir Valley | Agrowon

काश्‍मीर खोऱ्यात पावसाचा जोर घटला
वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने आणि रविवारी (ता.१) हवामानात सुधारणा झाल्याने झेलम नदीची पातळी घसरत आहे. असे असले तरी झेलम आणि तिच्या उपनद्या अद्याप धोक्‍याच्या पातळीवर वाहत आहे.

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने आणि रविवारी (ता.१) हवामानात सुधारणा झाल्याने झेलम नदीची पातळी घसरत आहे. असे असले तरी झेलम आणि तिच्या उपनद्या अद्याप धोक्‍याच्या पातळीवर वाहत आहे.

वेधशाळेने म्हटले, की काश्‍मीर खोऱ्यात कालच्यापेक्षा रविवारी हवामानात सुधारणा झाली आहे. मात्र अजूनही पावसाची शक्‍यता आहे. सोमवार सायंकाळपासून ते चार जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मात्र या स्थितीने घाबरण्याची गरज नाही, असे वेधशाळेने म्हटले आहे. पूरनियंत्रक कक्षाने झेलमच्या पातळीत घसरण होत असल्याचे सांगितले. दक्षिण काश्‍मीरमधील संगम येथे काल सकाळी १९.२३ फूट पातळीवरून वाहत असल्याची नोंद करण्यात आली. काल झेलम नदी २३ फुटांच्या पातळीवरून वाहत होती. त्याचवेळी राम मुन्शी बाग येथे हीच पातळी २३.१३ फूट इतकी नोंदली गेली. २१ फूट पातळी ही धोकादायक मानली जाते. दरम्यान, दक्षिण आणि मध्य काश्‍मीरमध्ये काल रात्रीपासून पाऊस थांबल्याने नदीचा स्तर कमी होत चालला आहे. गेल्या दोन दिवसांत पावसामुळे काश्‍मीरमध्ये तिघांचे बळी गेले आहेत. तसेच जम्मू-श्रीनगर महामार्गावरची वाहतूकही थांबवली होती. 

राजनाथसिंह यांचे मदतीचे आश्‍वासन
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काल (रविवारी) सकाळी जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांना राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. 

अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
खराब हवामानामुळे स्थगित केलेली अमरनाथ यात्रा रविवारी पुन्हा सुरू झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर ६ हजार ८७७ भाविकांचा चौथा जत्था काश्‍मीरमधील वेगवेगळ्या शिबिरासाठी रवाना झाला.
 

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...