पुणे जिल्ह्यात पावसाने जून महिन्याची सरासरी गाठली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : मॉन्सून दाखल होण्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाने दणक्यात हजेरी लावल्याने पुणे जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. जून महिन्याची सरासरी १३९.९ मिलिमीटर असून, यंदा ३० जूनपर्यंत १३९.८ मिलिमीटर (९९.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरासह मावळ तालुक्यात सर्वाधिक पावसाची, तर शिरूर व दौंड तालुक्यांत सर्वांत कमी पावसाची नोंद झाली असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील पुणे शहर आणि १३ तालुक्यांचा विचार करता पुणे शहरात १९० मिमी (१७७.७ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागामध्ये मावळ तालुक्यात सर्वाधिक ३०९.८ मिमी (१६५ टक्के) पाऊस पडला आहे. शिरूर तालुक्यात सर्वांत कमी पाऊस असून, तेथे ५४.२ मिमी (५०.७ टक्के) पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यात ५०.२ मिमी (६१.६ टक्के) पाऊस पडला आहे.

पश्‍चिम भागातील तालुक्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाबरोबर मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात पूर्वमोसमी पावसाने दणका दिल्याने पावसात खंड पडूनही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे चित्र आहे. यात पुरंदर तालुक्यात १३१.३ मिमी (१४८ टक्के) तर बारामती तालुक्यात १११.९ मिमी (१४२.५ टक्के) तर इंदापूर तालुक्यात १०५.६ मिमी (११४.५ टक्के) पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात जून महिन्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका  सरासरी पडलेला टक्केवारी
पुणे शहर १०७.४  १९०.९ १७७.७
हवेली १०७.४ ७६.२   ७०.९
मुळशी २३५.३ २९२.६  १२४.४
भोर १३८.९  १९९.८ १४३.८
मावळ  १८७.६ ३०९.८ १६५.१
वेल्हे ४१७.२ २७९.९ ७१.४
जुन्नर १००.९  ११४.६ ११३.६
खेड १०३.४  १०२.२ ९८.८
आंबेगाव ११२.७  १२५.८ १११.६
शिरूर १०६.९ ५४.२  ५०.७
बारामती  ७८.५ १११.९ १४२.५
दौंड ८१.५   ५०.२  ६१.६
पुरंदर   ८८.७ १३१.३ १४८.०
इंदापूर   ९२.२  १०५.६ ११४.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com