agriculture news in marathi, rain stopped till Thursday, Maharashtra | Agrowon

गुरुवारपर्यंत पावसाची उघडीप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

पुणे : मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे.

पुणे : मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे.

उन्हाचा चटका वाढल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. राज्यात पाऊस थांबल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. अनेक ठिकाणी पारा ३० अंशांच्या वर गेला आहे. ढगाळ हवामानामुळे विदर्भात पारा सरासरीच्या खाली असला, तरी त्यात हळूहळू वाढ होत आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर राज्यात उकाडाही वाढला आहे. मराठवाडा वगळता राज्यात रात्रीचे तापमान सरासरीच्या जवळपास अाहे.    

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत स.िक्रय आहे. उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, विषवृत्ताच्या दक्षिणेकडून येणाऱ्या मॉन्सून प्रवाहाचा मंदावलेला वेग यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पाऊस आेसरला आहे. गुरुवारपर्यंत (ता. ६) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज अाहे.  

रविवारी (ता.२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.१, जळगाव ३१.७, कोल्हापूर २८.०, महाबळेश्वर १८.८, मालेगाव ३१.०, नाशिक २८.२, सांगली २८.६, सातारा २६.५, सोलापूर २९.७, सांताक्रुझ ३१.०, अलिबाग ३१.३, रत्नागिरी २९.३, डहाणू ३०.४, आैरंगाबाद ३०.६, परभणी ३१.४, नांदेड ३१.५, बीड ३२.४, अकोला ३१.५, अमरावती २८.४, बुलडाणा २९.२, चंद्रपूर ३१.०, गोंदिया २८.५, नागपूर २८.३, वर्धा २९.०, यवतमाळ २७.५. 

रविवारी (ता.२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) :
कोकण : रामरज २८, पायंजे २०, वशी २९, मानगाव २२, पोलादपूर २५, खामगाव २२, मार्गताम्हणे २५, रामपूर ३०, शिरगाव ३२, अंजर्ला २०, भरणे २१, दाभील २०, धामनंद ३७, देव्हारे २१, अांगवली २०, माणगाव २३, भेडशी २२, कडूस २१, तळवडा २१.
मध्य महाराष्ट्र : नाणशी २४, इगतपुरी २७, त्र्यंबकेश्‍वर २१, शेंडी २५, बामणोली ४३, महाबळेश्‍वर ५४, अांबा २४,
मराठवाडा : मातोळा २७, बोधडी २४, जलधारा २१.
विदर्भ : कान्हाळगाव ६३, काट्टीपूर ३६, ठाणा ३७, आमगाव ३४, कवरबांध ३४, सालकेसा ३६, जिमलगट्टा ११०, पेरामल्ली ३२. 

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...