सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता

सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता

कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे फुलोऱ्यावर आलेल्या काजू आणि आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. दक्षिणेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर दोन-चार दिवस होता, आता पुन्हा एकदा गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असून आज पावसाने हजेरी लावली.  सायंकाळी चारच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस कोसळला. ढगाळ वातावरण पहाटेची थंडी आणि अचानक आलेला पाऊस हे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांना धोक्याची घंटा आहे हाता तोंडाची येणारा आंबा काजू फुलोऱ्यावर येत असतानाच नैसर्गिक संकट उभे राहिले आहे, यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीवर ही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतीची कामं उरकून शेतकरी उन्हाळी पीक घेण्याकडे वाढला होता. पावसाळी पिकाची भात कापणी करून जागोजागी गवत रचून ठेवले आहे, मात्र अधून मधून पाऊस हजेरी लावत असल्याने या नैसर्गिक संकटाचा फटका गरीब शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com