agriculture news in marathi, rain in western part of pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

पुणे  : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पूर्व भागातील दुष्काळीपट्ट्यात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात खरीप पेरण्याही सुरू झाल्या आहेत. मात्र पेरण्यांना वेग येण्यासाठी अाणखी जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

पुणे  : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पूर्व भागातील दुष्काळीपट्ट्यात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात खरीप पेरण्याही सुरू झाल्या आहेत. मात्र पेरण्यांना वेग येण्यासाठी अाणखी जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मावळ, मुळशी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मावळ तालुक्यातील कार्ला येथे सर्वाधिक ८३, तर लोणावळा येथे ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. भाेर, वेल्हे, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागांत अधूनमधून हलक्या सरी येत होत्या.

जिल्ह्यातील धरणांच्या परिसरातही पावसाला सुरवात झाली अाहे. मुळा-मुठा नदीच्या खोऱ्यात पावसाचा जोर अधिक आहे. नीरा आणि भीमा नदीच्या उपखोऱ्यातही पाऊस पडत असून, घोड नदीच्या खोऱ्यातील धरण परिसरात पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. भीमेच्या उपखोऱ्यातील वडिवळे येथे २८, मुळा-मुठा खोऱ्यातील पवना येथे २०, मुळशी येथे ५०, टेमघर येथे ३१, वरसगाव येथे १७, पानशेत येथे १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मि.मी.- स्रोत कृषी विभाग) : पौड ४२, घोटावडे १७, माले ५०, मुठे २९, पिरंगुट १८, भोलावडे ३२, निगुडघर १८, काले १७, कार्ला ८३, खडकाळा १८, लोणावळा ७५, शिवणे १७, वेल्हा २३, पाणशेत १७, विंझर १२, अंभवणे १५, राजूर १९, कुडे २०.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...