agriculture news in Marathi, rain will increased in kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात पावसाचा जोर वाढणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसासाठी आता पुन्हा पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या रविवारपर्यंत (ता.५) कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वातावरण अंशत: ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मागील दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकेही सुकत असल्याची चित्र होते. मराठवाड्यात पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसासाठी आता पुन्हा पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या रविवारपर्यंत (ता.५) कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वातावरण अंशत: ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मागील दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकेही सुकत असल्याची चित्र होते. मराठवाड्यात पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

मात्र, आता पावसासाठी पोषक वातावरणाची चिन्हे जाणवू लागली आहेत. त्यामुळे काही काळ गायब झालेला पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोकणातील माथेरान, म्हसळा, पोलादपूर, मध्य महाराष्ट्रातील लोणावळा, महाबळेश्वर, पाटण, गगनबावडा, राधानगरी, मराठवाड्यातील अहमदपूर, कंधार, मुखेड, उदगीर, औढा नागनाथ, बिलोली, चाकूर, विदर्भातील सिंरोंचा, आमगाव, अर्जुनीमोरगाव, भामरागड, कोर्ची अशा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच अंबोणे, शिरगाव, दावडी, कोयना, ताम्हिणी, लोणावळा, वळवण, खोपोली या घाटमाध्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

गुजरात ते राजस्थानचा दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर अंतर या दरम्यान आहे. त्यामुळे वारे कोकणाच्या दिशेने काही प्रमाणात वाहत असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बांग्लादेश आणि पश्चिम बंगाल, बंगालचा उपसागर या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर प्रदेशाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मिलिमीटर उंचीवर आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

गुरुवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस ः (मिलिमीटरमध्ये) कोकण ः माथेरान, म्हसळा, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख ४०, चिपळून, खेड, महाड, सुधागड, पाली ३०, भिरा, मंडणगड, पेण, श्रीवर्धन, उल्हासनगर २०, मध्य महाराष्ट्र ः लोणावळा, महाबळेश्वर ५०, पाटण ४०, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी २०, चंदगड, इगतपुरी, पन्हाळा, त्र्यंबकेश्वर १० मध्य महाराष्ट्र : अहमदपूर ४०, कंधार, उदगीर ३०, औढा नागनाथ, बिलोली, चाकूर, जळकोट, लोहा, नायगाव खैरगाव २०, विदर्भ : सिंरोचा २०, आमगाव, अर्जुनी मोरगाव, भामरागड, कोर्ची, लांखांदूर, सालेकसा १०. 

 

इतर अॅग्रो विशेष
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...