कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा जोर वाढणार

कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा जोर वाढणार
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा जोर वाढणार

पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २०) राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.  ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यातच मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचे पूर्व-पश्‍चिम जोड क्षेत्र आहे. यामुळे राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.  रविवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली. धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग कायम सुरूच आहे. पाऊस पडण्यास पोषक स्थितीमुळे मंगळवारपर्यंत (ता. २१) विदर्भ, कोकणात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग) :  कोकण : महाड ५०, चिपळूण ५५, खेर्डी ६८, मार्गताम्हाणे ६५, रामपूर ७०, वाहल ५८, सावर्डे ७६, असुर्डे ८६, कळकवणे ६५, शिरगाव ७८, दापोली ५६, बुरोंडी ५३, दाभोळ ५५, अंजर्ला ५१, वेळवी ५९, अंबवली ५२, भरणे ६३, दाभील ६५, कडवी ९६, मुरडव ८५, माखजन ६४, फुणगुस ८३, फणसावणे ९२, अंगवली ५५, देवरुख ६७, माभले ७२, नांदगाव ५६.  मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ५६, घोटी ३९, धारगाव ४४, शेंडी ५७, माले ५१, मुठे ६८, भोलावडे ४२, निगुडघर ३५, काले ५१, कार्ला ३६, खडकाळा ३२, लोणावळा ४६, पाणशेत ३२, राजूर ३५, आपटाळे ४५, वाडा ३४, कुडे ३४, बामणोली ४९, केळघर ३३, हेळवाक ७६, मरळी ६५, मोरगिरी ५०, कुठरे ४७, महाबळेश्‍वर ९२, तापोळा ६२, लामज ९७, कोकरुड ३९, चरण ४३, कळे ३९, बाजार ४४, भेडसगाव ४२, करंजफेन ८७, सरूड ४५, मलकापूर ७०, आंबा ९९, राधानगरी ७२, गगनबावडा ६२, साळवण ७५, कडेगाव ३०, कराडवाडी ३५, गवसे ३६, चंदगड ४६, हेरे ३८. मराठवाडा : निवघा १४, आष्टी १५, मोघाळी १०, देगलूर १०, इस्लापूर १०, दहेली २१, हिमायतनगर १५, जवळगाव १०, सरसम १०, सिंदखेड १३, बसमत ७५, कुरुंदा ५२, आजेगाव १५.  विदर्भ : हिवरा ३५, येवता ३१, वाळगाव ३८, दवरगाव ३५, शिरळा ४०, पापळ ४१, वाऱ्हा ७५, मोझारी ४०, रिद्धापूर ४१, पहेला ५२, खामारी ४२, साकोली ४४, काट्टीपूर ३७, सौदाद ५९, दारव्हा ३०, कोर्ची ३२, कोटगुळ ४१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com