agriculture news in marathi, 'Rainbow 2017', VNMAU Parbhani | Agrowon

आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१७'ला प्रांरभ
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

परभणी : माती, समाज आणि देशाचे ऋण फेडण्यासाठी कलावंतांनी काम करावे. पारितोषिक हे कलावंताचे अंतिम ध्येय नसते. विद्यार्थी, कलावंतांनी आपल्या कलेचा उपयोग देशासाठी करावा, असे आवाहन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी रविवारी (ता. ५) येथे केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१७’चे उद्‍घाटन आमदार डाॅ. राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. भालेराव बोलत होते.

परभणी : माती, समाज आणि देशाचे ऋण फेडण्यासाठी कलावंतांनी काम करावे. पारितोषिक हे कलावंताचे अंतिम ध्येय नसते. विद्यार्थी, कलावंतांनी आपल्या कलेचा उपयोग देशासाठी करावा, असे आवाहन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी रविवारी (ता. ५) येथे केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१७’चे उद्‍घाटन आमदार डाॅ. राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. भालेराव बोलत होते.

कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डाॅ. पी. जी. इंगोले, कुलसचिव डाॅ. गजेंद्र लोंढे, डाॅ. अशोक कडाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डाॅ. महेश देशमुख, विनोद गायकवाड, डाॅ. पी. आर. शिवपुजे, डाॅ. अजय देशमुख, डाॅ. अनिल पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी शेतकरी जीवनावरील...
शेतामंधी माझी खोप, तिला बोराटीची झाप,
तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप

आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून लिहिलेली
शिक बाबा शिक लढायला शिक,
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक

या सर्वाधिक गाजलेल्या कविता सादर केल्या. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी युवक महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते.

डाॅ. व्यंकटेश्वरलू म्हणाले, स्मार्ट फोनच्या युगात व्यक्ती आत्मकेंद्री होत आहेत. देशातील अनेक लोककला प्रकार लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या कलाप्रकाराचे संवर्धन विद्यार्थ्यांतील युवक कलावंतांनी करणे आवश्यक आहे. यावेळी ऐश्वर्या डावरे हिने गणेश वंदना तर माधुरी मीना हिने राजस्थानी लोकनृत्य सादर केले. प्रास्ताविक डाॅ. देशमुख यांनी केले तर डाॅ. व्ही. डी. पाटील यांनी स्वागत केले.

उद्‍घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविध विद्यापीठांच्या संघांनी कला प्रकार सादर केले. गुरुवार (ता. ९) पर्यंत चालणाऱ्या युवक महोत्सवामध्ये संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय आणि ललित कला अशा विभागांतील विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कला सादर करणार आहेत. या महोत्सवामध्ये राज्‍यातील कृषी व अकृषी मिळून २० विद्यापीठांतील जवळपास एक हजार स्‍पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...