नांदेड, परभणी, हिंगोलीतील ३० तालुक्यांत पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीतील ३० तालुक्यांत पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ३० तालुक्यांत पाऊस

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील १४३ मंडळांमध्ये रविवारी (ता. ८) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा (७३ मिमी), पिंपरखेड (६५ मिमी) या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे जमीन खरडून गेल्याने पिकांच्या मुळ्या उघड्या पडल्या. गुरुवार (ता. ५) पासून या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. पिकांतून पाणी वाहिल्यामुळे नुकसान होत आहे. परंतु जून महिन्यात सरासरी न गाठलेल्या मंडळांवर अजूनही पाऊस रुसला असल्यामुळे पेरणी लांबत चालली आहे.

शनिवारी (ता. ७) दुपारनंतर या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये भुरभुर तर काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस सुरू होता. हदगाव (जि. नांदेड) तालुक्यातील हदगाव, तामसा, पिंपरखेड शिवारात चार ते पाचच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यातील सर्व ७८ मंडळांमध्ये पाऊस झाला. परंतु हदगाव, भोकर, उमरी, मुखेड, कंधार, किनवट, हिमायतनगर, माहूर, मुदखेड तालुक्यात अधिक तर बिलोली, देगलूर, अर्धापूर तालुक्यात जोर कमी होता. परभणी

जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ३५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. पाथरी मंडळामध्ये पाऊस प्रथमच जोरदार बरसला. परंतु बाभळगाव मंडळामध्ये अजून रुसलेलाच आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार झाला. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यात जोरदार झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ११, नांदेड ग्रामीण ११, वजीराबाद १२, वसरणी १७, तरोडा १०, तुप्पा १२, लिंबगाव ११, विष्णुपुरी १०, अर्धापूर ८, दाभड १०, हदगाव ४३, तामसा ७३, मनाठा २८, पिंपरखेड ६५, निवघा २४, तळणी २४, आष्टी ३१, किनवट १३, इस्लापूर ३६, मांडवी ६४, बोधडी २३, दहेली ६, जलधारा १४, शिवणी ६, माहूर १५, वाई १३, वानोळा १२, सिंदखेड १७, हिमायतनगर २०, सरसम १९, जवळगाव २१, मुदखेड १४, मुगट १०, बारड १५, भोकर ४२, मोघाळी ४०, मातुळ ३६, किनी ३३, उमरी ३०, शिंदी ३५, गोलेगाव ३०, धर्माबाद ५, जारिकोट १०, करखेली १६, नायगांव १०, नरसी ७, मांजरम १२, बरबडा १३, कुंटूर १६, लोहगाव १२, कुंडलवाडी १२, आदमापूर ७, देगलूर ६, खानापूर ७, शहापूर ७, मरखेल १३, मालेगाव ९, हानेगाव ९, मुखेड ५०, जांब ८, येवती २२, जहूर ३४, चांदोला १८, मुक्रमाबाद ४२, बाऱ्हाळी ४१, कंधार ४५, कुरुला १०, फुलवळ ३३, पेठवडज ४५, उस्मानगर २९, बारुळ १४, लोहा १७, मालकोळी २४, कलंबर ६, शेवडी ६, सोनखेड ६,कापशी १२.

परभणी जिल्हा ः जांब ९, झरी ६, सिंगणापूर २०, दैठणा २५, पिंगळी १६, जिंतूर १८, सावंगी म्हाळसा २२, बामणी १०, चिकलठाणा २१, मानवत ६, केकरजवळा ४०, पाथरी ४३, बाभळगाव ५, सोनपेठ ५, आवलगाव ५, गंगाखेड २६, राणीसावरगाव ६, महातपुरी ८, पालम ७, चाटोरी ८, लिमला ३८, कात्नेश्वर ५, चुडावा ६.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १०, माळहिवरा २१, सिरसम १५, बासंबा ५७, नरसी नामदेव १२, डिग्रस ३७, कळमनुरी ४३, नांदापूर ५१, आखाडा बाळापूर ५६, डोंगरकडा ३२, वारंगा फाटा ४०, वाकोडी ३८, सेनगाव ८, गोरेगांव ४५, आजेगाव ४०, पाकनेरगाव १४, हत्ता ९, वसमत ५, हट्टा ९, कुरुंदा ५, आंबा ६, हयातनगर ९, औंढानागनाथ८,जवळा बाजार १५, येळेगाव १४, साळणा २६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com