अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू आहे. तेथेही गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळ सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणात ८०.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणातील पाणीसाठा ४६.७७ टक्‍क्‍यांवर गेला असून, सध्या ३ हजार ४१६ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील भंडारदरा, हरिचंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड, घाटघर भागातच पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अकोले तालुक्‍यातही गुरुवारपासून पाऊस कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत चोवीस तासांत घाटघरला २९, रतनवाडीला १, पांजरेला २८, भंडारदरा येथे २३, निळवंडेला ५, कोतुळला ४ मिलीमीटर पाऊस झाला. भंडारदरा धरणात ८८९९, निळवंडेत २८७८, मुळात १२ हजार १६१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

अकोल्यातील जोरदार पावसामुळे मुळा धरणात मागील चार-पाच दिवसांत बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. चार दिवसांपूर्वी १७ हजार क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. आता मात्र पाऊस कमी झाल्याने आवक कमी झाली आहे. नांदुर मधमेश्‍वरमधूनही गोदावरीत नदीत २९ हजार क्‍युसेकने आवक सुरू होती. ती कमी करून ६३१० क्‍युसेकवर आली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र पाऊस नसल्याने गाव तलाव, पाझर तलाव, बंधारे कोरडे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com