Agriculture News in Marathi, Rainfall boost the Turmeric crop, Sangli District | Agrowon

हळदीच्या वाढीसाठी पाऊस ठरला उपयुक्त
अभिजित डाके
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017
सांगली ः जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेला पाऊस हा हळद पिकासाठी उपयुक्त ठरतो आहे. यामुळे हळद पिकांची वाढ चांगली होऊ लागली आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 
 
सांगली ः जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेला पाऊस हा हळद पिकासाठी उपयुक्त ठरतो आहे. यामुळे हळद पिकांची वाढ चांगली होऊ लागली आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 
 
जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्‍टरवर हळदीची लागवड झाली आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी हळदीची उशिरा लागवड केली. जिल्ह्यातील वाळवा, मिरज, कडेगाव काही प्रमाणात कवठेमहांकाळ तालुक्‍यात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र, वाढीच्या दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. उपलब्ध पाण्यावर हळद पीक बहरले होते.
 
पाण्याची कमतरता असल्याने उत्पादनात घट निश्‍चित होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेला पाऊस हळद पिकाची वाढीसाठी उपयोगी ठरत आहे. हळदीचा फुटवादेखील वाढण्यास मदत होऊ लागली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाण्याचे योग्य नियोजन होऊ लागले आहे. हळदीच्या उत्पादनातही वाढ होण्याची शक्‍यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 
 
गेल्या पंधरा दिवसांत झालेला पाऊस हळद पिकासाठी उपयुक्‍त ठरतो आहे. या पावसामुळे पिकांची वाढ होण्यास मदत झाली असून उत्पादनात काहीशी वाढ होण्याची शक्‍यता आहे.
- मनोज पाटील, हळद उत्पादक शेतकरी, पोखर्णी, ता. वाळवा, जि. सांगली.
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...
दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी...देशात दुधाचा ओघ वाढ आहे. इतरवेळी जेवढी मागणी...
दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर...पुणे ः महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध...
दूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफीलपुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे...
राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्तमंचर, जि. पुणे : राज्यात दररोज दोन कोटी वीस लाख...
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामानपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य...
शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमाताचा...
दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा...वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा...
दूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुललाखगंगा, जि. औरंगाबाद : फुकट दूधवाटप केल्यानंतर...
येडियुरप्पांची आज अग्निपरिक्षानवी दिल्ली  : कर्नाटकात सत्ता स्थापन...
पिकांच्या अवशेषांपासूनही बनणार इथेनॉलनवी दिल्ली ः देशात मोठ्या प्रमाणात होणारी...
निवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील...वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील...
मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरणपुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या...