agriculture news in marathi, Rainfall in the dam area of ​​Pune district | Agrowon

पुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला सुरवात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला सुरवात झाली आहे. सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या धरणांच्या क्षेत्रातही पावसाला सुरवात झाली आहे. साेमवारी (ता. १८) सकाळपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरीप सुरू होती. धरणांमध्ये पाणी जमा होण्यास सुरवात झाली असली, तरी धरणातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे.

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला सुरवात झाली आहे. सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या धरणांच्या क्षेत्रातही पावसाला सुरवात झाली आहे. साेमवारी (ता. १८) सकाळपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरीप सुरू होती. धरणांमध्ये पाणी जमा होण्यास सुरवात झाली असली, तरी धरणातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी पडत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर येथे २५, वरसगाव येथे १४, पानशेत येथे १३ आणि खडकवासला धरणक्षेत्रात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पवना धरणक्षेत्रात १२, मुळशी धरणक्षेत्रात १३, कलमोडी धरणक्षेत्रात १४, चासकमान धरणक्षेत्रात ३, भामा अासखेड धरणक्षेत्रात ८, आंद्रा धरणक्षेत्रात ४, वडीवळे धरणक्षेत्रात १७ मिलिमीटर पाऊस पडला. नीरा नदीच्या खोऱ्यातील धरणांच्या पाणलोटातील गुंजवणी धरणक्षेत्रात ११, भाटघर धरणक्षेत्रात ३ तर नीरा देवघर
धरणक्षेत्रात १० मिलमीटर पावसाची नोंद झाली.

नाझरे धरण परिसरातही हलक्या सरी पडल्या. कुकडीच्या खोऱ्यातील वडज धरणक्षेत्रात ४, डिंभे धरणक्षेत्रात १० आणि उजनी धरणक्षेत्रातही तीन मिलिमीटर पावसाची नाेंद झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

 

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...